होते पहिल्यांदा
काल रात्री भेटली होती आलिया भट
कार्यालयातून परतत होती
थकून भागून
वैतागलेली
सकाळी गेलेली घरातून
काही न खाता-पिता
बाॅसने आज तिला पुन्हा बोलावले होते केबिनमध्ये
तो पुनःपून्हा तिलाच का बोलावत असतो?
एके दिवशी भेटली होती आलिया भट
मंडईत भाजी खरेदी करताना
जेव्हा लिंबाचे भाव वाढले होते बरेचसे
हातात पिशवी घेऊन
काखेत गोड बाळ वागवत
मला पाहताच नमस्कार केला तिने
विचारले बाई कशा आहेत?
एके दिवशी त्यांना घेऊन घरी या
एक दिवस आलिया भट ला
मी पाहिले
बसमध्ये बसली होती ती
खिडकीमधून बघत होती बाहेर
तिचे डोळे उदास होते
ती कुण्या तार्याला शोधत होती
जो हरवला होता अंतरिक्षात कुठे दूर
एक दिवस मी आलिया भट ला पाहिले
झाडाखाली उभी होती
कुणाची तरी वाट बघत
शून्यात
वार्याशी बोलताना
पानांशी हितगुज साधताना
फांद्यांचे दुःख आपल्या अंतरात साठवताना
एक दिवस पाहिले मी
हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होती आलिया भट
किती आजारी होती
आधीच हडकुळी
मी तिला विचारले
काय झालेय तुला
ती काही नाही बोलली
फक्त ती म्हणाली
बाईंना सांगा,
माझ्या लेकराचे नाव आपल्या
शाळेत नोंदवा
खूप उपकार होतील
आलिया भट चा नंतर पत्ता
नाही लागला
कुठे निघून गेली ती अचानक
ती पुन्हा कधी नाही दिसली माझ्या गल्लीत
शहरात
जिल्ह्यात
राज्यात
देशात
अखेर कुठे निघून गेली ती
तिच्या घराचा पत्ता ठाऊक नाही
तिच्याकडून कधी फोननंबर पण
नाही घेतला
शोधतो आहे आलिया भट ला तेव्हापासून
जेव्हाही टायपतो आलिया भट
इंस्ट्राग्रामवर
लग्नाचा एक फोटो समोर येतो
अखेर माझी आलिया भट कुठे
निघून गेली
जिला मी तिच्या बालपणापासून पाहिले होते
पाहिले होते तिला तरूण होताना
पाहिलेले तिला ऐन तारूण्यात वृद्धा होतानादेखील
पाहिलेले तिला एक चिमणी होताना
पाहिले होते तिला एक दिवस पंखांशिवाय उडताना
पाहिले होते तिला आकाशावर आपली व्यथाकथा लिहिताना
मला नीटसे आठवतसुद्धा नाहीये
कुठे पाहिले होते तिला मी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा
परत ये आलिया भट
परत ये
हेच बडबडत असतो
दररोज
आपल्या स्वप्नामध्ये
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
आलिया भट्ट को कहां देखा था
पहली बार
कल रात मिली थी आलिया भट्ट
दफ्तर से लौट रही थी
थक कर चूर
परेशान
सुबह की निकली हुई घर से
बिना कुछ खाये पीये
बॉस ने आज उसे फिर बुलाया था केबिन में
वह बार बार उसे ही क्यों बुलाता है?
एक दिन मिली थी आलिया भट्ट
बाज़ार में सब्जी खरीदते हुए
जब नींबू के दाम बढ़ गए थे काफी
हाथ मे झोला उठाये
गोद मे लिए प्यारा सा बच्चा
मुझे देखते ही नमस्कार किया उसने
पूछा बीबी जी कैसी हैं.?
किसी दिन उनको लेकर घर आइए
एक दिन आलिया भट्ट को मैंने देखा
बस में बैठी थी वह
खिड़की से देख रही थी बाहर
उसकी आंखें उदास थीं
वह किसी तारे को खोज रही थी
जो खो गया था अंतरिक्ष मेंकहीं दूर
एक दिन मैंने आलिया भट्ट को देखा
पेड़ के नीचे खड़ी थी
किसी की प्रतीक्षा करती हुई
शून्य में
हवा से बातें करती हुई
पूछती हाल पत्तियों से
टहनियों के दुख को अपने भीतर समेटे
एक दिन देखा मैंने
अस्पताल में भर्ती थी आलिया भट्ट
कितनी बीमार थी
पहले से दुबली पतली
मैंने उससे पूछा
क्या हो गया हैतुमको
वह कुछ नहीं बोली
सिर्फ उसने इतना कहा
बीबी जी से कहिएगा
मेरे बच्चे का नाम अपने स्कूल में लिखवा दें
बड़ी कृपा होगी
आलिया भट्टका फिर पता नहीं चला
कहां चली गयी वह अचानक
वह फिर कभी नहीं दिखी मेरे मोहल्ले में
शहर में
जिले में
राज्य में
देश में
आखिर कहां चली गयी वह
उसके घर का पता नहीं मालूम
उससे कभी फोंन नंबर भी नहीं लिया
खोज रहा हूँ आलिया भट्ट को तब से
जब भी टाइप करता हूँ आलिया भट्ट
इंस्टाग्राम पर
विवाह की एक तस्वीर उभर आती है
आखिर मेरी आलिया भट्ट कहाँ चली गयी
जिसको मैने उसके बचपन मे देखाथा
देखाथा उसे जवान होते हुए
देखा था उसे भरी जवानी में बूढ़ी होते हुएभी
देखा था उसे एक चिड़िया बनते हुए
देखाथा उसे एक दिन बिना पंखों के उड़ते हुए
देखाथा उसे आसमान पर अपनी व्यथा कथा लिखते हुए
मुझे ठीक ठीक याद भी नहीं आ रहा है
कहाँ देखा था उसे मैंने अपने जीवन में पहली बार
लौट आओ आलिया भट्ट
लौट आओ
यही बुदबुदाता रहता हूँ
रोज
अपने सपने
में
©विमल कुमार
Vimal Kumar
सुंदर रचना.. या सर्व आलीया पर्यंत वेळेत सुख ( मागणी अवास्तव झाली का? ) पोहचावे या प्रार्थनेसह!!!
उत्तर द्याहटवा