तुझा मुकुट
माझ्या पायाशी पडला आहे
याचे काय करू?
याला पायाखाली चेमटू-चिरडू?
की माझ्या डोक्यावर सजवू-मिरवू?
की इतिहासाच्या कचराकुंडीत फेकून देऊ?
माझ्या डोक्यावर सजवला-मिरविला
तर
मीही तुझ्यासारखाच होऊन जाईन
आणखी कुणाच्यातरी डोक्यावर ठेवला तर
तोही तसाच जसा तू
बरे होईल
याला कुठल्याशा मुलाकडे देऊ
ते मूल याच्याशी चेंडूप्रमाणे खेळेल
उडवेल आपल्या हातांनी
पायाने ठोकरेल
जोवर नाही होऊन जाणार
हे पूर्णपणे छिन्नविच्छिन्न
त्याचे मन भरणार नाही
एक मूल
जेव्हा यावर जोराने बॅट मारेल
तेव्हा याचे तुकडे
जगातील दूरदूरच्या देशांमध्ये पसरतील
तुझ्या मुकुटाचा
हाच सर्वोत्तम अंत ठरेल!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ताज
तुम्हारा ताज
मेरे कदमों पर पड़ा है
इसका क्या करूँ
इसे पैरों से रौंदूं
या अपने सिर पर सजा लूं
या इतिहास के कूड़ेदान में फेंक दूँ
अपने सिर पर सजाऊंगा
तो मैं भी तुम्हारी तरह हो जाऊंगा
किसी और के सिर पर रखूंगा
तो वह भी वैसा ही जैसे तुम
बेहतर है
इसे किसी बच्चे को दूँ
वह गेंद की तरह खेलेगा इससे
उछालेगा अपने हाथों से
पैरों से ठोकर देगा
जब तक नहीं हो जाता
यह पूरी तरह क्षत-विक्षत
उसका मन नहीं भरेगा
एक बच्चा
जब इस पर जोर से बल्ला घुमाएगा
तो इसके चिथड़े
दुनिया के सुदूर देशों में फैल जायेंगे
तुम्हारे ताज का
यही सबसे अच्छा हश्र होगा !
©राजहंस सेठ
Rajhans Seth