दंगल

दंगल

दंगल

एकजण म्हणाला-
आमचा धर्म संकटात आहे
चला,परधर्मियांविरूद्ध लढूया
बघता-बघता त्याच्यामागे
हजारोंची गर्दी जमा झाली

समोरून दूसरा म्हणाला-
तो खोटे बोलतोय
धर्म खरे तर आमचा धोक्यात आहे
चला त्यांच्याशी लढूया
त्याच्यामागेही 
हजारो लोक आले

मला त्यांच्या धर्मांची नव्हे
त्या सर्वांची चिंता होती
मी ओरडून ओरडून म्हणालो-
चला, आपण सगळे मिळून
त्यांच्याविरूद्ध लढूया ज्यांच्यामुळे
आपण सर्वजण संकटात आहोत

माझ्यामागे कुठली गर्दी आली नाही

ती दोघं दरवेळेस
लढून-मरूनसुद्धा जिवंत राहिले
आणि मी न लढताही
प्रत्येकवेळी मारला गेलो !

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

दंगा 

एक ने कहा -
हमारा धर्म खतरे में है
चलो, विधर्मियों से लड़ते हैं
देखते-देखते उसके पीछे 
हजारों की भीड़ जमा हो गई

सामने से दूसरे ने कहा -
वह झूठ बोलता है
धर्म तो वस्तुतः हमारा खतरे में है
आओ उनसे लड़ते हैं
उसके पीछे भी
हजारों लोग लग गए

मुझे उनके धर्म की नहीं
उन सबकी चिंता थी
मैंने चीख-चीखकर कहा -
आओ, हम सब मिलकर
उनसे लड़ते हैं जिनकी वजह से
हम सब खतरे में हैं

मेरे पीछे कोई भीड़ नहीं आई

वे दोनों हर बार
लड़-मरकर भी जिंदा रहे
और मैं बिना लड़े ही
हर बार मारा गया !

©ध्रुव गुप्त
Dhruv Gupt 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने