बुलडोझर

बुलडोझर

बुलडोझर

एक

बुलडोझरचा इतिहास सांगतो
की बुलडोझरने 
कधी काही निर्माण नाही केले
तोडले आहे 
पाडले आहे 
खोदले आहे

बुलडोझरचा हुंकार भरणार्‍यांचा 
इतिहासदेखील तेच सांगतो
यांनी काही निर्मिले नाही
निर्माण करण्यात यांना रस नाही
विध्वंस यांच्या पसंतीचा खेळ आहे
विध्वंसच यांचे राजकारण आहे

बुलडोझर हे एक संवेदनाविहीन यंत्र आहे
ज्यास तुटण्याचे दुःख होत नसते
कुणाच्या दुःखाने दुःखी न होण्याने
माणूस यंत्र होऊन जातो.

दोन

यंत्र 
स्वतः नाही चालत
चालवले जात असते
यंत्राला जागे करा
अडवा अथवा वळवा
यंत्राच्यावर बसलेल्या व्यक्तीला ओळखा
यंत्रावर बसलेल्या इसमाचा चेहरा
बुलडोझरसारखा असेल

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

बुलडोजर

1

बुलडोजर का इतिहास बताता है
कि बुलडोजर ने
कभी कुछ बनाया नही
तोड़ा है गिराया है खोदा है

बुलडोजर की हुंकार भरने वालों का इतिहास भी
बताता है
इन्होंने कुछ बनाया नही
निर्माण में इनकी रुचि नही
विध्वंस इनका पसंदीदा खेल है
विध्वंस ही इनकी राजनीती है

बुलडोजर संवेदना रहित एक मशीन है
जिसे टूटने का दुःख नही होता
किसी के दुख में दुःखी न होने से
मनुष्य मशीन हो जाता है

2

मशीन
खुद नही चलती 
चलाई जाती हैं
मशीन को जगाओ
रोको या मोड़ो
मशीन के ऊपर बैठे व्यक्ति को पहचानो
मशीन पर बैठे व्यक्ति की शक्ल
बुलडोजर जैसी होगी

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने