हो मी ही पाहिलेय रामायण
ज्यात हजारो हनुमान
लाखो लक्ष्मणांसाठी
संजीवनी घेऊन उभे आहेत
कितीतरी राम
आपल्या सीतांसमवेत
वनवासात चालत आहेत
ऐका!
या रामायणाची सर्वात सुंदर
गोष्ट ही आहे की,
त्रास-अडचणीतदेखिल
कुणाचीही जात
विचारली गेली नाही!
मूळ हिंदी कविता
पावेल
मराठी अनुवाद
भरत यादव