मजूराच्या कविता

मजूराच्या कविता

मजूराच्या कविता

गटारी साफ करणार्‍या मुलाचे
कधीतरी शरीर पाहा,
त्याच्या वाट्याचे मांस
संसदेची चरबी होऊन आलेय
तो गटारी साफ नाही करत!
तो शतकानुशतके,
दररोज
आमचे नागडे सत्य काढत असतो उपसून
ज्यास आम्ही लोकशाहीच्या गटारीत
मागील ७२ वर्षांपासून लपवत आलो आहोत.

२.
आम्ही किती सभ्य आहोत?
ते रस्त्यावर खराटा मारणारा व्यक्ती सांगेल !
त्याच्या हातामध्ये आहे
आमच्या सभ्य असण्याचे रिपोर्ट कार्ड!
पुरावा असेल!
हे जग किती सुंदर आहे,
किती असणार?
हे तुमचा ईश्वर नव्हे,
तो सफाई कर्मचारी ठरवेल
जो आमचा दुर्व्यवहार 
रोज सकाळी झाडून काढत असतो.

३.
कामगार चौकात जमलेल्या 
मजूरांच्या गर्दीत
कधीतरी डोकावून या-
दिसेल त्यांच्या डोळ्यांमध्ये
भारताचा खराखुरा नकाशा !

त्यांच्या चेहर्‍यावर सरकारी योजनांच्या 
जळून गेलेल्या प्रतींची राख दिसेल आणि 
त्यांच्या पोटाच्या एका मोठ्या भागावर संसद पाय लांबवून पसरलेली असेल

४.
माझ्या डोळ्यात
ते मजूर आपली दोनवेळची भाकर हुडकत होते
मी चौकात उभा
आपल्या मित्रांना शोधत होतो

शोधत आम्ही दोघे होतो
फरक एवढा होता,
भाकरीची नजर जास्त व्याकूळ होती
प्रेमापेक्षा !

५.
अद्याप बाकी आहे मोजणे
पृथ्वीचा गुरूत्वभार

जो पडला आहे
रोज संध्याकाळी परतणार्‍या
मजूराच्या पाठीवर !

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

१.

नाली से कचरा निकालते बच्चे की
कभी देह देखना, 

उसके हिस्से का मांस 
संसद की चर्बी बनकर उभर आया है

वह नाले से कचरा नहीं निकालता! 

वह सदियों से, हर दिन
हमारा नंगा सच निकाल रहा होता है 
जिसे हम लोकतंत्र के गटर में, 
बहत्तर वर्षों से छिपाते आ रहे हैं। 

२.

हम कितने सभ्य हैं 
वो सड़क पर झाड़ू लगाता शख्स़ बतायेगा! 
उसके हाथों में है, 
हमारे सभ्य होने का रिपोर्ट कार्ड! 

सनद रहे! 
यह दुनिया कितनी सुंदर है, 
कितनी होगी ? 
यह तुम्हारा ईश्वर नहीं, 
वो सफाईकर्मी तय करेगा 
जो हमारे दुर्व्यहार को हर सुबह बुहारता है। 

३.

लेबर चौक पर लगी मजदूरों की भीड़ में 
कभी झाँक कर देखना-
दिखेगा उनकी आँखों में, 
भारत का असली नक्शा! 

उनके चेहरे पर सरकारी योजनाओं की
जल चुकी प्रतियों के राख दिखेंगे और 
उनके पेट के एक बड़े हिस्से पर संसद टाँग पसारे लेटा होगा। 

४.

मेरी आँखों में 
वे(मजदूर) अपनी दो वक़्त की रोटी ढूंढ रहे थे
मैं चौराहे पर खड़ा
अपने मित्र को ढूंढ रहा था 

ढूंढ हम दोनों रहे थे 
फ़र्क इतना था, 
रोटी की निगाहें ज्यादा कातर थीं 
प्रेम की अपेक्षा! 

५.

अभी शेष है मापना 
पृथ्वी का गुरुत्वीय भार

जो पड़ा है, 
हर शाम लौटते 
मज़दूर की पीठ पर! 

©Aditya Rahbar
आदित्य रहबर 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने