राजाने सांगितलं आहे,
सामाजिक अंतर राखा
बाहेर जाऊ नका
कुठलासा घातक
रोग आहे बाहेर
मुलगी हसली
राजाच्या सांगण्यावर,
म्हणाली,
फारच लेट आहे राजा!
केव्हापासून आई सांगते आहे
कधीपासून रोखताहेत वडिल
केव्हापासून रागावतोय भाऊ
की सामाजिक अंतर ठेव
बाहेर जाऊ नकोस,
कुठलासा घातक रोग आहे बाहेर!
मूळ हिंदी कविता
विरेंदर भाटिया
Virendar Bhatia
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav