जंगलात प्रवेश करताना
शहरातला एक माणूस विचारतो,
काय जंगल इथून सुरु होते?
जंगल म्हणते,
फक्त जंगल नाही
इथून एक संस्कृती सुरू होते!
जंगलामधून बाहेर पडताना
तो शहरी माणूस विचारतो,
काय जंगल इथे संपते?
जंगल म्हणते,
फक्त जंगल नाही,
इथून एक संस्कृती संपते!
याच्यापुढे काय आहे?
जंगल सांगते,
याच्यापुढच्या जगात
संस्कृती आणि मनुष्याच्या नावावर
एक नाटक सुरु होते
जिथे तुमची इच्छा नसतानाही
तुम्हाला फक्त प्रेक्षक बनवले जाते
जसे दृष्य बदलते
कुणी माणूस रस्त्यावर चालतोय
तेव्हा प्रेक्षक फक्त टाळी वाजवतो
थाळी वाजवतो...!
मूळ हिंदी कविता
जसिंता केरकेट्टा
Jashinta Kerketta
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav