मंदिर,मशिद,चर्च फोडल्यानंतर
तुमची वेदना इतकी तीव्र असते
की,
शतकानुशतके घेत राहता
त्याचा हिशोब
परंतू जंगल ज्यांचे पवित्र स्थळ आहे
त्यांना उद्धवस्त केल्याचा हिशोब,
कोण देणार साहेब?
कुणास ठाऊक कधीपासून धर्म-धर्म
खेळत आहात
जे तुमच्या धर्माच्या कक्षेत येत नाहीत
ते अरण्याला पूजतात,
अरण्याला जाणतात
तिथेच जगतात,तिथेच मरतात
तुम्ही सर्वजण बूटं घालून
त्यांच्या पवित्र स्थळात कसे घूसता?
विकास म्हणून म्हणून जेवढे निर्दोष
मारलेत ना,
त्या सगळ्यांचा हिशोब
कोण देणार साहेब?
ते जे जंगलात,डोंगरात राहतात
ते वनवासी नव्हेत,आदिवासी आहेत
त्यांना त्यांच्याच जमिनीवरती
का अस्पृश्य बनवून ठेवत आहात?
आपला आपला धर्म घेऊन
इकडे का येत असता?
येऊन पुन्हा धर्मासहित त्यांच्या संस्कृतीवरती
बुलडोझर का चालवता?
प्रत्येक काळात तुम्ही सर्वजण
सोबत असता,
त्यांची पवित्र स्थळं उद्धवस्त करणाऱ्यांबरोबर
शेवटी त्या सगळ्याचा हिशोब
कोण देणार साहेब?
कसला धर्म आहे तुमचा?
आपसात तर झगडून मरत असता
निसर्ग जो तुमचे पालन-पोषण करतो
त्यालाही सोडत नाही तुम्ही
आम्ही आयुष्यभर झुंजू
तुमच्या याच संस्कृतीविरुध्द
फक्त एवढेच सांगा,
या धरतीला उद्धवस्त केल्याचा
हिशोब,
शेवटी देणार कोण साहेब?
मूळ हिंदी कविता
जसिंता केरकेट्टा
Jashinta Kerketta
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav