आदिवासी

आदिवासी

आदिवासी

मी धरतीवरचा पहिला माणूस
मी कुण्या ऋषीची अनैतिक संतती नव्हे
माझा रामायण-महाभारत यांच्यामधल्या 
बोधकथांशी काही संबंध नाही
मीच भारतभूमीतला पहिला पूर्वज आहे

ना मी आस्तिक आहे
ना मी नास्तिक आहे
मी वास्तविक आहे !!
ना मी अडाणी आहे
ना मी अशिक्षीत आहे
मी आदिवासी आहे
निसर्गाची भाषा समजून घेणारा
निसर्गाचे नियम जाणणारा

मी एकटा असा मानवसमूह आहे
ना धर्मपरिवर्तनाच्या भितीने डोंगरात लपलेला आहे
ना राजकीय भितीने जंगलात शरण घेतली आहे
निःस्वार्थपणे आपल्या बळावर स्वातंत्र्य 
कायम ठेऊ शकलोय
ना मी मोगल-इंग्रजांची चमचेगिरी-गुलामगिरी केली होती
ना लेकीबहिणी भेटीदाखल देऊन सुरक्षितता मिळविल्याचा माझा इतिहास आहे
अरावली,विंध्याचल,सातपुड्यापासून ते 
जंगल महालापर्यंतच्या डोंगरकपारीत 
माझ्या पूर्वजांच्या खाणाखुणा जीवंत आहेत!!

मी जन्मापासूनच स्वतंत्र राहणारा मनुष्य आहे
मी आदिवासी आहे
ना मी ब्राह्मण ( पुरोहित )
ना मी क्षत्रिय ( रक्षण )
ना मी वैश्य ( व्यवसाय )
ना मी शुद्र ( सेवक )
मी एकमेव चारही गुण असलेला
आदिवासी आहे

मी आदिवासी आहे
ना मी ख्रिस्ती आहे
ना मी हिंदू आहे
ना मी मुस्लीम आहे
मी निसर्गनिवासी आदिवासी आहे
ना मी पाप-पुण्य नशिब-पुनर्जन्म यांवर 
विश्वास ठेवणारा आहे
ना थोतांड- कर्मकांड-अंधश्रद्धा यांचा प्रचारक आहे
ना मला स्वर्गाची अभिलाषा आहे
ना मला नरकाची भीती वाटते
मी तर निसर्गकन्या-पुत्र आहे
मी आदिवासी आहे

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

आदिवासी

मैं धरती का पहला इंसान,
मैं किसी ॠषि की अवैध संतान नहीं हूँ!!
मुझे रामायण महाभारत की बोघकथाओं से कोई ताल्लुक नहीं।
मैं ही भारतभूमि का पहला पूर्वज हूँ!!
ना में आस्तिक हूँ,
ना में नास्तिक हूँ,
मैं वास्तविक हूँ!!
ना मैं गंवार हूं, 
ना मैं अनपढ़ हूँ, 
मैं आदिवासी हूं!!
प्रकृति की भाषा समझने वाला,
प्रकृति के नियम समझने वाला,
मैं अकेला इंसानी समूह हूँ!!
ना ही धर्म परिवर्तन के डर से पहाड़ों में छिपा हुआ हूं, 
ना राज के डर से जंगल की शरण लिए हूं,
निस्वार्थ अपने दम पर आज़ादी बरकरार रख पाया हूँ, 
ना मैंने मुगल _अंग्रेजों की चमचागिरी_गुलामगीरी की थी, 
ना बहन बेटियों के उपहार देकर संरक्षण पाने का इतिहास हैं,
अरावली _विंध्याचल _सातपुड़ा से जंगल महल तक की पहाड़ियों पर मेरे पूर्वजों के निशान जिंदा हैं!!
मैं जन्म से ही स्वतंत्र रहने वाला इंसान हूँ, 
मैं आदिवासी हूँ!!
ना मैं  ब्राह्मण (पुजारी) 
ना  मैं क्षत्रिय (रक्षा)
ना मैं  वैश्य (व्यवसाय)
ना मैं शूद्र (सेवक)
मैं एकमात्र ही चारों गुण रखने वाला आदिवासी हूँ, 
मैं आदिवासी हूँ!!
ना मैं ईसाई हूँ,
ना मैं हिन्दू हूं,
ना मैं मुस्लिम हूं,
मैं प्रकृति मूलक आदिवासी हूं!!
ना मैं पाप-पुण्य, भाग्य_पुनर्जन्म का विश्वासी हूं, 
ना पाखंड, कर्मकांड, अंधविश्वास का प्रचारक हूं, 
ना मैं स्वर्ग-नर्क का अभिलाषी हूं, 
मैं तो प्रकृति पुत्र हूँ, 
मैं आदिवासी हूँ!

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने