जेव्हाही एखादी स्त्री म्हणत असते
मला आकाशात उडायचे आहे
तर लोक म्हणायला लागतात,
'तू कुणी चिमणी नाहीयेस
स्त्रीचे चिमणी असणे
भारतीय संस्कृतीच्या विरूद्ध आहे'
जेव्हाही एखादी स्त्री म्हणत असते
ती नदीत पोहू इच्छिते
लोक म्हणतात,
'तू काही मासळी नाहीयेस
आणि कुण्या स्त्रीचे मासळी होणे
आपल्या समाजाच्या विरूद्ध आहे'
जेव्हाही एखादी स्त्री म्हणत असते
मी माझ्या पसंतीचा पेहराव करू इच्छिते,
तर लोक म्हणत असतात,
'तू कुणी परी नाहीयेस
स्त्रीचे परी असणे
आपल्या संस्कारांविरूद्ध आहे'
जेव्हा एखादी स्त्री बोलू पाहाते
आपल्या आदिम इच्छांविषयी
लोक म्हणत असतात,
'ही तर उघड उघड अश्लिलता झाली
आणि हे तर स्त्रीच्या प्रतिष्ठेविरूद्ध आहे'
खरेतर
जेव्हा एखादी स्त्री विचारत असते
एखादा सवाल
तर सगळे पुरूष तिलाच
घेराटा घालून
विचारायला लागतात प्रश्न.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जब भी कोई स्त्री कहती है
मैं चाहती हूँ आसमान में उड़ना
तो लोग कहने लगते हैं
तुम चिड़िया नहीं हो
स्त्री का चिड़िया होना
भारतीय संस्कृति के खिलाफ है
जब भी कोई स्त्री कहती है
वह चाहती है नदी में तैरना
लोग कहते हैं तुम मछली नही हो
और किसी स्त्री का मछली होना
हमारे समाज के खिलाफ है
जब भी कोई स्त्री कहती है
मैं चाहती हूं
पहनना अपनी पसंद के कपड़े
तो लोग कहते हैं
तुम कोई परी नही हो
स्त्री का परी होना
हमारे संस्कारों के खिलाफ है
जब कोई स्त्री चाहती है करना
अपनी आदिम इच्छाओं की बात
लोग कहते हैं
यह तो सरासर अश्लीलता है
और यह तो स्त्री की गरिमा के खिलाफ है
दरअसल जब कोई स्त्री उठाती है
कोई प्रश्न
तो सारे पुरुष उसे ही
घेर कर
करने लगते हैं सवाल.
©विमलकुमार
Vimalkumar