महाप्रलय

महाप्रलय

महाप्रलय

खूप जुनं आहे त्यांचं दुःख
जुन्या चादरी आणि 
जुन्या कांबळ्यांहूनही जुनं
जुनी भांडी आणि 
जुन्या पिंपळवृक्षाहूनही जुनं
पडिक विहिरी,
सुकलेले तलाव,
उजाड गायरानं आणि 
पडक्या घरांच्या अवशेषांहूनही जुनं
उजाड बेवारस रेल्वेसंपत्तीहूनही जुनं
जुन्या जखमा आणि 
जुन्या अवैध काॅलन्याहूनही जुनं
रेती आणि बर्फाहूनही 
पुरातन आहे त्यांचं दुःख
धरणी आणि समुद्राहूनही जुनं....
जितकं जुनं आहे मीठ
तितकं जुनं आहे त्यांचं दुःख
वा त्याहूनही जुनं
की जितकी जुनी आहे हिंसा....

तुम्ही विचार करत असाल 
ते कोण लोक आहेत
जे धूराप्रमाणे उठतात 
आणि पसरतात
धुळीप्रमाणे उडतात 
आणि खाली बसतात
राखेसारखे झडतात 
आणि हरवून जातात

तुम्ही जाणून घेऊ पाहाल त्यांची नावं
त्यांच्या वाडवडिलांची नावं
त्यांची भाषा आणि 
त्यांच्या धर्माचं नाव !
त्यांची नावं वेग-वेगळ्या भाषेत आहेत
आणि धर्म कुठलाही असो
परंतू त्यांची भीती आश्चर्यकाररित्या एकसमान आहे
ते जगातील सर्वात जुने रहिवासी आहेत
आणि सर्वात जुने स्थलांतरितसुद्धा
त्यांचे चेहरेसुद्धा मिळते-जुळते आहेत
ते जगातले सर्वाधिक सतावले गेलेले लोक आहेत
ते आपल्या मोहल्यात आणि 
वस्तीतदेखील विस्थापितांचं 
जीवन जगण्यासाठी मजबूर केले जातात
त्यांच्या घरांना दंगलींमध्ये 
सर्वात अगोदर आग लावली जाते 
आणि सरकारी बुलडोझरांनी 
सर्वात आधी उद्धवस्त केले जाते
ते सर्वात जास्त डोळ्यात सलणारे
कष्टकरी लोक
सर्वात दुर्बल समजले जाणारे लोक
एक दिवस उठतील
आणि ठामपणे उभे राहतील
तमाम जुलूमी हुकूमशहांच्याविरोधात
आणि आपल्या सगळ्या 
जुन्या दुःखांचा हिशोब मागतील
एक दिवस महाप्रलय इथूनच सुरू होईल
इथेच बसेल सर्वात मोठे न्यायालय
आणि होईल न्याय...

असहाय्य वस्त्या उद्धवस्त करणारे 
तुम्ही सत्ताधीश लोक त्यादिवशी 
कुठल्या परमेश्वराचा धावा कराल?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

महशर

बहुत पुराना है उनका दुःख 
पुरानी चादरों और पुराने कम्बलों से भी पुराना 
पुराने बर्तनों और पुराने पीपल के दरख़्तों से भी पुराना
जर्जर कुओं, सूखे तालाबों, बंजर चरागाहों और खण्डहर मकानों से भी पुराना 
उजाड़ परित्यक्त रेल संपत्तियों से भी पुराना 
पुराने ज़ख़्मों और पुरानी अवैध कॉलोनियों से भी पुराना 
रेत और बर्फ़ से भी प्राचीन है उनका दुःख
धरती और समुद्र से भी पुराना...
जितना पुराना है नमक 
उतना पुराना है उनका दुःख 
या उससे भी पुराना 
कि जितनी पुरानी है हिंसा...

आप सोचते होंगे आख़िर वे कौन लोग हैं 
जो धुएँ की मानिंद उठते हैं और फैल जाते हैं 
धूल की तरह उड़ते हैं और बैठ जाते हैं 
राख की तरह झड़ते हैं और खो जाते हैं 

आप जानना चाहते होंगे उनके नाम 
उनके बाप दादाओं के नाम 
उनकी ज़ुबान और उनके मज़हब का नाम !
उनके नाम अलग-अलग भाषाओं में हैं 
और मज़हब कोई भी हो 
लेकिन उनके डर अद्भुत रूप से समान हैं 
वे दुनिया के सबसे पुराने मकीन हैं 
और सबसे पुराने मुहाजिर भी
उनके चेहरे भी मिलते-जुलते से हैं 
वे दुनिया के सबसे सताए हुए लोग हैं 
वे अपने मुहल्लों और बस्तियों में भी विस्थापितों की सी ज़िंदगियाँ बसर करने पे मजबूर किये जाते हैं 
उनके घरों को दंगों में सबसे पहले आग लगाया जाता है 
और सरकारी बुल्डोज़रों से सबसे पहले नेस्तोनाबूद किया जाता है 
वे सबसे ज़्यादा खटने वाले मेहनतकश लोग 
सबसे कमज़ोर समझे जाने वाले लोग 
एक दिन उट्ठेंगे 
और डटकर खड़े हो जाएँगे 
तमाम ज़ालिम तानाशाही हुकूमतों के ख़िलाफ़ 
और अपने सारे पुराने दुःखों का हिसाब माँगेंगे 
एक दिन महशर यहीं से उट्ठेगा 
यहीं लगेगी सबसे बड़ी अदालत 
और होगा न्याय...

आप मज़लूम बस्तियाँ उजाड़ने वाले हुक्मरान लोग 
उस रोज़ किस ख़ुदा को याद करेंगे ?

©अदनान कफिल दरवेश
Adnan Kafeel Darwesh 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने