असेच राहू दिले पाहिजे
माणसांना बंद
घरांच्या आत!
की झाडं उगवू शकतील
पुन्हा मातीतून
चिमण्या पुन्हा घरटी बनवू शकतील
जिथे पाहिजे तिथे!
की हवा स्वच्छ होऊ शकेल
नद्या पुन्हा जिवंत होतील
की कोलाहल संपून जाईल आणि
तारे स्पष्ट दिसायला लागतील आकाशात
आणि प्राणी आपल्या
जुन्या अधिवासात परतू लागतील,
ज्यावर माणसांनी अतिक्रमण केलंय!
असेच राहू द्यायला हवे
माणसांना बंद
घरांच्या आत,
की धरतीच्या जखमा भरुन येतील !
मूळ हिंदी कविता
अज्ञात
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav