आश्चर्यमुग्धतेच्या वेळी,
आताही निघत असते तोंडामधून
'अरे देवा!'
खरेतर आस्तिकतेला मोक्ष मिळून कैक वर्षे झालीयत.
कितीतरी वर्षे झालीयत हात जोडून.
कितीक वर्षे झालीत विश्वकल्याणाची
प्रार्थना हिंदूंच्या देवतांना करून.
भलेही ईश्वर आता फक्त एक विस्मयादिबोधक चिन्ह
असो अथवा अर्धवट वाक्य.
परंतू या हिंदूकाळात तोंडामधून ईश्वराचे बाहेर पडणे भाळावर चंदन लावून फिरणेच आहे.
आताही मंगळवारी नखे कापताना
कुठल्याशा अशुभाची प्राचीन शंका घेरून टाकते.
भलेही आता याची भीती नसली वाटत तरी.
वस्तुतः आता ईश्वर नाहीये तर-
रस्ता लक्षपूर्वक ओलांडत असतो,
धावता धावता ट्रेन नाही पकडत,
व्यायाम करत असतो,
गोड कमी खातो,
सिगरेट नाही ओढत,
हेल्मेट वापरतो,
कुत्र्यांपासून सावध राहातो,
भाजपेयींच्या तोंडाला नाही लागत,
जे हवे असते त्यासाठी प्रार्थनेऐवजी
आणखी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.
आता बराच मोकळा वेळ मिळतो तर मग
एखाद्या मंदिरात फिरायला जात असतो कधी-कधी.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ईश्वर के बिना जीवन-
आश्चर्य के क्षणों में,
अब भी निकल जाता है मुँह से 'हे भगवान!'
जबकि आस्तिकता को मोक्ष मिले कई साल हो गए।
कई साल हो गए हाथ जोड़े।
कई साल हो गए विश्व-कल्याण की प्रार्थना हिंदुओं के देवताओं से किये।
भले ईश्वर अब सिर्फ एक विस्मयादिबोधक चिह्न हो
या अधूरा जुमला।
लेकिन इस हिन्दू समय में मुँह से ईश्वर का बाहर आ जाना
माथे पर चंदन लगाकर घूमना ही है।
अब भी मंगल को नाखून काटते
किसी अनिष्ट की प्राचीन आशंका घेर लेती है।
भले अब इससे डर नहीं लगता...।
चूंकि अब ईश्वर नहीं है तो-
सड़क ध्यान से पार करता हूँ,
दौड़कर ट्रेन नहीं पकड़ता,
व्यायाम करता हूँ, मीठा कम खाता हूँ, सिगरेट नहीं पीता।
हेलमेट लगाता हूँ, कुत्तों से सतर्क रहता हूँ।
भाजपाइयों के मुँह नहीं लगता।
जो चाहिए होता है उसके लिए प्रार्थना के बजाय और ईमानदार प्रयास करता हूँ।
अब काफी खाली वक़्त मिल जाता है तो
किसी मंदिर में घूमने चला जाता हूँ
कभी-कभी।
©रचित
Rachit