आम्ही तुझ्या मुर्ती बनविल्यात तथागता,
निरनिराळ्या मुर्ती.
आम्ही मोठमोठ्या मुर्तींखाली
उदबत्या जाळत असतो.
परंतू चांगली गोष्ट ही की
मुर्तींच्या डोळ्यांमध्ये धूरामुळे चुरचुरत नाही.
आम्ही अष्टांगिक मार्गाऐवजी
आमच्या या पिढीला
तुझ्या अवतार असण्याच्या कथा ऐकविल्यात.
तू आमच्या पिढ्यांसाठी खूप कामी आला आहेस सिद्धार्था,
आम्ही भेटीदाखल दिल्यात
तुझ्या छोट्या छोट्या मुर्ती.
माझ्या आसपास खूप सारे तिबेटी भिक्खु राहातात,
मी त्यांच्या डोळ्यांमध्ये निर्वासितपणाची वेदना वाचत असतो
त्यात दुहेरी दुःख आहे
एक स्वतःच्या निर्वासितपणाचे
आणि एक तुझ्या.
किती वर्षे झालीत गौतमा!
तू निर्वासित असल्यापासूनच तर आहेस आमच्यामध्ये
जातींच्या जटिल जंजाळामध्ये
करूणा शोधताना.
मला वाटते
हा काळ तुझी क्षमा मागण्याचा आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हमनें तुम्हारी मूर्तियां बनाई हैं तथागत
तरह-तरह की मूर्तियां.
हम बड़ी-बड़ी मूर्तियों के नीचे
अगरबत्तियां जलाते हैं.
किन्तु अच्छी बात यह है
कि मूर्तियों की आंखों में धुंआ नहीं चुभता.
हमनें अष्टांमार्ग के बदले
अपनी इस पीढ़ी को
तुम्हारे अवतार होने की कहानियां सुनाई हैं.
तुम हमारी पीढ़ियों के बहुत काम आए हो सिद्धार्थ
हमनें उपहारों में दी हैं
तुम्हारी छोटी-छोटी मूर्तियां.
मेरे आसपास बहुत से तिब्बती भिक्षुक रहते हैं
मैं उनकी आंखों में
निर्वासन का दर्द पढ़ता हूं
उनमें दोहरा दर्द है
एक अपने निर्वासन का और एक तुम्हारे.
कितने वर्ष हो गए हैं गौतम !
तुम निर्वासित से ही तो हो हमारे बीच में
जातियों की जटिल सरंचनाओं के बीच
करुणा तलाशते हुए.
मुझे लगता है यह वक्त तुमसे माफी मांगने का है.
©अशोक कुमार
Ashok Kumar