हे बुद्ध !

हे बुद्ध !

हे बुद्ध!

बुद्ध! तुम थे तब भी
थे ही तुम टुटे हुए इन्सानों को बांधते,
तुम्हारे बाद भी तुम हो ही
ध्वस्त इन्सानों की सांसों को जोड़ते हुए।

जिन्होंने लिया नही होता तुम्हें साथ में
उनके साथ भी तुम होते ही हो
और जो चलते रहते हैं अंधेरे को जलाते हुए
उनके भी साथ तुम रहते हो।

अब भी हरा भरा है हे बुद्ध
दुनिया के ज्ञान का खलिहान 
तुम्हारे कारण
अब भी चाॅंद सुरज हैं हे बुद्ध
लोगों के आसमान में 
तुम्हारे कारण।

ज़हन में तुम ही रहते हो
जगमगाता हुआ मैं लिखता हुॅं जब
और बुद्ध बनते है शब्द मेरे.
मेरे वाक्यों से खिलते हैं
तुम्हारे निरन्तर चलनेवाले कदम।
लगता है तुम्हारी भरी हुई आंखो में से 
एक आंसू मेरे लिए भी है
और मेरी आंखो की बरसात को भी
तुम्हारी मुस्कान के पंख आ जाते है।
 
हिन्दी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूल मराठी रचना

बुद्धा!

बुद्धा! तू होतास तेव्हाही
होतासच तू तोडलेली माणसे बांधत,
तुझ्यानंतरही तू आहेसच
भग्न माणसांचे श्वास सांधत.

ज्यांनी घेतलेले नसते तुला सोबत
त्यांच्यासोबतही तू असतोसच
आणि जे चालतात अंधार जाळत
त्यांच्याहीसोबत तू असतोसच.

अजूनही हिरवेगार आहे बुद्धा
दुनियेच्या ज्ञानाचे वावर तुझ्यामुळे
अजूनही चंद्रसूर्य आहेत बुद्धा
लोकांच्या गगनात तुझ्यामुळे.

डोक्यात तूच असतोस
झगमगत मी लिहितो तेव्हा
आणि बुद्ध होतो शब्द माझा.
माझ्या वाक्यांमधून उमलतात
तुझी निरंतर चालणारी पावले.
वाटते तुझ्या गदगदलेल्या डोळ्यातील
एक अश्रू माझ्यासाठीही आहे
आणि माझ्या डोळ्यातील पावसालाही
तुझ्या स्मिताचा पिसारा येतो.

©यशवंत मनोहर
Yashwant Manohar

{ 'अग्निपरिक्षेचे वेळापत्रक' मधून साभार }

पुढे 
अभिजीत जाधव यांचे सादरीकरण

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5160286114017936&id=100001097950630
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने