माझ्या स्वप्नांत नेहमी दिसतात
वैशालीनगरीतील युद्धानंतरचे
अगणित प्रेतांचे ढिगारे
आणि
दुर्गंधीच्या मध्ये
फिरत असलेल्या
थकले-भागलेल्या
उदास तथागतांची सावली
त्यांच्यासमोर पडलेली असते
अजातशत्रूची रक्तरंजीत तलवार
आम्रपालीचे डोळे
एकटक बघत असतात
लिच्छवींच्या मारेकर्याकडे
दुरून कुठूनसा उसळतो एकाएकी
विधवांचा थकलेला
सामुहिक विलाप
जवळच्या वृद्ध पिंपळवृक्षावरून
येतो,
पाखरांचा दबका-कापरा आवाज
इथे तिथे तुटलेल्या पतंगी घेऊन
उदास बसलेली भेटतात पोरं
मी नेहमी भेटावयास जातो
वैशालीच्या कोसळत चाललेल्या अवशेषांना
विचारत असतो त्यांना
युद्धामुळे कुणाला काय मिळाले होते?
त्यांच्यापाशी कुठलेच उत्तर नव्हते
उत्तर असणार तरी कसे?
बुद्ध खरेच तर सांगून गेले होते,
युद्धानंतर केवळ प्रश्नच शिल्लक राहतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
युद्ध के बाद
मेरे सपनों में अक्सर
दिख जाती हैं वैशाली में
युद्ध के बाद असंख्य लाशों के ढेर
और दुर्गंध के बीच टहलते हुए
थके, उदास बुद्ध की छाया
उनके सामने पड़ी होती है
अजातशत्रु की रक्तरंजित तलवार
आम्रपाली की आंखें
घूर रही होती हैं एकटक
लिच्छवियों के हत्यारे को
दूर कहीं से उठता है अचानक
विधवाओं का थका हुआ
समवेत विलाप
पास के बूढ़े पीपल से आती हैं
चिड़ियों की दबी-सहमी आवाजें
यहां-वहां टूटी पतंगें लिए
उदास बैठे मिल जाते हैं बच्चे
मैं अक्सर मिलने जाता हूं
वैशाली के ढहते खंडहरों से
पूछता हूं उनसे
युद्ध से किसको क्या मिला था
उनके पास कोई उत्तर नहीं होता
उत्तर हो भी कैसे
बुद्ध सच ही कह गए थे
युद्ध के बाद केवल प्रश्न ही रह जाते हैं।
©ध्रुव गुप्त
Dhruv Gupt