ईश्वराचे वरदान

ईश्वराचे वरदान

ईश्वराचे वरदान

जे ईश्वरवादी आहेत ते बचावतील
जे ईश्वरवादी आहेत
पण ज्यांच्या देवाचे नाव दूसरे काहीतरी आहे
ते मारले जातील
जे अनिश्वरवादी आहेत
पण ज्यांची मूळं भारतभूमीत आहेत
त्यांना तूर्तास सहन केले जाईल
परंतू एक दिवस त्यांनासुद्धा
त्यांच्या अवैदिक असण्याची शिक्षा दिली जाईल 
आणि ते ही मारले जातील

ईश्वरवादी आणि वैदिक असूनही
जे तथाकथित खालच्या जातीतले असतील 
ते ही मारले जातील

कुणाला सोडले जाणार नाही
आदिवासी शहरात असोत 
अथवा जंगलात
कुलदेवता आणि वनदेवता त्यांच्याकडून 
हिसकावून घेतल्या जातील आणि 
त्यांच्याकडून 
वैदिक देव-देवता पूजविल्या जातील
तरीही ते मारले जातील

आणि जे लोक
या वेडेपणाविरोधात
डोके वर काढतील किंवा 
आवाज उठवतील 
ते ही मारले जातील

बचावण्याची फक्त एकच अट असेल
माणूस म्हणविण्याच्या आपल्या हक्काला 
सोडावे लागेल
कसे तरी आपल्या बचावून राहाण्यालाच 
ईश्वराचे वरदान 
मानावे लागेल...

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

ईश्वर का वरदान 

जो ईश्वरवादी हैं वे बचे रहेंगे
जो ईश्वरवादी हैं
लेकिन जिनके ईश्वर का नाम कुछ और है
वे मारे जाएँगे
जो अनीश्वरवादी हैं
लेकिन जिनकी जड़ें भारत-भूमि में हैं
उन्हें फ़िलहाल बर्दाश्त किया जाएगा
लेकिन एक दिन उन्हें भी
उनके अवैदिक होने की सज़ा दी जाएगी
और वे भी मारे जाएँगे 

ईश्वरवादी और वैदिक होने के बावजूद
जो नीची जातियों के होंगे
वे भी मारे जाएँगे

किसी को बख़्शा नहीं जाएगा
आदिवासी शहर में हों या जंगल में
कुलदेवता और वनदेवता
उनसे छीन लिए जाएँगे  
और उनसे अपने देवता पुजवाए जाएँगे
फ़िर भी वे मारे जाएँगे

और जो अपने लोग
इस ख़ब्त के खिलाफ़
सर या आवाज़ उठाएँगे
वे भी मारे जाएँगे

बचे रहने की सिर्फ़ एक शर्त होगी
अपने इंसान कहलाने का हक़ छोड़ना होगा
किसी तरह अपने बचे रहने को ही
ईश्वर का वरदान समझना होगा ...

©प्रशांत जैन
Prashant Jain 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने