परता
आपल्या धार्मिक चिन्हांना
शोधत शोधत
शतकानुशतकांच्या अंधःकारात
परता
परता
सनातनी दर्पाच्या दिशेने परतताना
स्वकीयांवरच करण्यात आलेल्या
अत्याचार आणि व्यभिचारात
परता
परता
आपल्या पराभवांना विजयामध्ये बदलविण्याकरिता इतिहासाची पाने टरकावत आपल्या गुलामीच्या
भूतकाळात परता
परता
तमाम सुफी परंपरा आणि सद्भाव यांना
नाकारत आपल्या क्रूर काळात परता
परता
दलित स्त्रियांकडून स्तनकर
वसूल करतानाच पुरूषांच्या
कमरेवर खराटा बांधायला
विसरू नका
परतताना
मिटवत जा ती सारी दृष्येदेखील
जी आता तुम्हाला अप्रिय आहेत
उद्धवस्त करीत जा सारी शिल्पे
जी कुण्या दूसर्या वंशियांनी
कोरली आहेत
तुमच्याजवळ आता अभिमान
बाळगण्याजोगे काहीही
उरलेले नाहीये
त्यामुळे मागच्या दिशेने परता
परता
त्या ठिकाणापर्यंत परता
जिथे तुमच्या टोकदार हातात
वंशविशिष्ट हाडकं असतील
माहित असतानाही
की याप्रमाणे मागे परतणे
सभ्यतेकडून असभ्यतेकडे
परतणे होय आणि
मानवतेकडून क्रूरतेच्या दिशेनेदेखील
परता तुम्ही
आपल्या संपूर्ण अधःपतनासह
परता.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
अपनी बर्बर काल में लौटो
लौटो
अपने धार्मिक चिन्हों को ढूंढते हुए
सदियों के अंधकार में लौटो
लौटो
सनातन दर्प की ओर लौटते हुए
अपनों पर ही किये गए अत्याचार और व्यभिचार में लौटो
लौटो
अपनी पराजयों को जय में बदलने के लिए
इतिहास के पन्ने फाड़ते हुए
अपनी गुलामी के अतीत में लौटो
लौटो
तमाम सूफ़ी परम्पराओं और सद्भाव को नकारते हुए
अपने बर्बर काल में लौटो
लौटना
दलित स्त्रियों से स्तन कर बसूलते
उनके पुरुषों की कमर पर
झाड़ू बांधना मत भूलना
लौटते हुए
मिटाते जाना वे सारे दृश्य भी
जो अब तुम्हें अप्रिय लगते हैं
ध्वस्त करते जाना सारे शिल्प
जो किसी दूसरी नस्ल ने गढ़े हों
तुम्हारे पास अब गर्व योग्य कुछ भी नहीं
इसलिए पीछे की ओर लौटो
लौटो
उस मुकाम तक लौटो
जहां तुम्हारे नोकीले हाथों में
नस्ल विशेष की बोटियाँ हों
जानते हुए भी कि
इस तरह पीछे लौटना
सभ्यता से असभ्यता की ओर लौटना है
ओर मानवता से बर्बरता की ओर भी
लौटो तुम
अपनी पूरी गिरावट के साथ लौटो ।
©राजहंस सेठ
Rajhans Seth