एका अनाम सैनिकाच्या समाधीवर

एका अनाम सैनिकाच्या समाधीवर

एका अनाम सैनिकाच्या समाधीवर

किती उल्हासात माणसे निघतात युद्धावर
किती जोशात स्वच्छ करतात आणि 
ठासतात आपल्या बंदूका
किती उत्साहाने गातात गाणी लढाईची
किती व्यग्रतेने घूसतात खंदकात
किती अस्वस्थतेने ऐकतात बाॅम्बचे आवाज
किती हट्टाने उडतायत गोळ्या हवेत
किती सावकाशपणे वाहतेय त्यांच्या भाळावरून रक्त
किती आश्चर्याने पाहतायत त्यांचे डोळे शून्यात
किती आखडून पडलीयत त्यांची प्रेतं चिखलात
किती झटपट त्यांना फेकले जातेय कबरीत
किती लवकर त्यांना विसरले जाते कायमसाठी

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 
🍁
हिंदी अनुवाद

एक अनजान सिपाही की कब्र पर 

कितनी खु़शी से आदमी जाते हैं जंग पर
कितने जोश से साफ़ करते और भरते हैं अपनी बंदूकें 
कितने उत्साह से गाते हैं तराने जंग के
कितनी व्यग्रता से घुसते हैं खंदकों में
कितनी बेचैनी से सुनते हैं धमाके बमों के
कितनी ज़िद से सनसनाती हैं गोलियाँ हवा में
कितने धीमे से बहता है उनके माथे से लहू
कितने ताज्जुब से देखती हैं उनकी आँखें शून्य को
कितनी अकड़ी हुई पड़ी रहती हैं उनकी लाशें कीचड़ में
कितनी फुर्ती से उन्हें फेंका जाता है कब्र में
कितनी जल्दी से उन्हें  भुलाया जाता है हमेशा के लिए

हिंदी अनुवाद : 
आशुतोष दुबे

मूळ इंग्रजी कविता
ऑस्कर हान

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने