आजोर्‍याचा ढिगारा

आजोर्‍याचा ढिगारा

आजोर्‍याचा ढिगारा

हजारो अश्रू  हजारो तळतळाट
दोन जोड स्वप्नं  दोन मूठ आनंद
एक खेळणे,
दोन तीन नाणी आणि चार भांडी

एक लंगडी खुर्ची  एक घडीचे टेबल
एक कुराण मजीद
एक छोटीशी रेहाल

दिवंगत आज्याचा फोटो,
आज्जीचा चष्मा
काही किश्शे गोष्टी,
काही किश्शे गोष्टी काही जिवंत आत्मे

अब्बा-अम्मीची आयुष्यभराची मेहनत
आयुष्यभरची अपेक्षा

हे घर जे आजोर्‍याच्या ढिगार्‍यामध्ये बदलून गेलेय
हे सगळं काही आहे याच्याखाली

आणि या आजोर्‍याच्या ढिगार्‍याच्या
खूप खूप खाली आहे एक देश,
माझा देश! तुमचा देश!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

हजार आंसू हजार आहें
दो जोडी सपने दो मुठ्ठी खुशियां
एक खिलौना,
दो तीन सिक्के और चार बर्तन।

एक लंगडी सी कुर्सी एक तख्ती की टेबुल एक कुरान मजीद एक छोटी सी रेहाल

मरहूम दादा की तस्बीह,नानी की ऐनक
कुछ किस्से कहानियां कुछ किस्से कहानियां कुछ जिंदा रूहें

अब्बा अम्मी की उम्र भर की मेहनत
उम्र भर की हसरत

ये घर जो मलबे के ढेर में बदल चुका है
ये सब कुछ है इसके नीचे

और इस मलबे के ढेर के बहुत नीचे है एक देश,
मेरा देश! तुम्हारा देश!

©अमीर अजीज
Amir Ajeej

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने