राजाला वरदान आहे
त्याला कुणी मारू शकत नाही
परंतू सोबत एक इशारासुद्धा आहे,
त्याला लहान लहान जखमांपासून
सावध राहावे लागेल.
या जखमांना जर मुंग्या लागल्या
तर राजाला कुणीही वाचवू नाही शकणार.
राजाच्या पायाखाली अनेक मुंग्या चिरडल्या जात असत
कधी राजा त्यांना रागाने चिरडायचा
कधी प्रेमाने आणि
कधी कधी तर उगीचच.
मुंग्या वैतागल्या होत्या
त्यांना राजाच्या जखमेची प्रतिक्षा होती,बरोब्बर तशीच जशी सापाच्या जखमेची प्रतिक्षा असते मुंग्यांना.
एक दिवस राजाने घोषणा केली की
त्याला एकच रंग पसंत आहे
बाकीच्या रंगांनी एकतर राज्य सोडून जावे अथवा आपला रंग फिक्कट करून घ्यावा.
राज्यात गोंधळ उडाला
काहींनी राजाचा आदेश मानत आपला रंग फिक्कट करून घेतला,
काहींनी आपला रंग भडक राखण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि या अपराधाखाली तुरूंगातही जात राहिले.
राजाच्या पायाखाली चिरडत
राहिले.
परंतू काही रंग भूमिगत झाले
राजाच्या विरूद्ध बंडाचा झेंडा उभारला
राजानेदेखील यांच्या विरोधात आपले संपूर्ण सैन्य उतरवले.
पण भयंकर दडपशाही होऊनसुद्धा
बंडखोरांनी राजाला एक लहानशी जखम केलीच
मुंग्यांना याच गोष्टीची तर प्रतिक्षा होती.
मुंग्यांनी क्रमबद्ध होऊन राजाच्या जखमेवर हल्ला केला
राजा आणि त्याचे खासगी सैनिक
मुंग्यांना मारत राहिले !
परंतू मुंग्यांच्या रांगेला तर अंतच नव्हता
दारे,खिडक्या सगळे बंद केली गेली
पण कधी झरोक्यातून,
कवाडांच्या फटींमधून,
सगळ्या छिद्रांमधून
मुंग्यांचा शिस्तबद्ध जमाव पुढे
सरकतच राहिला
मुंग्या मरत राहिल्या,
दूसर्या मुंग्या मरणार्या मुंग्यांच्यावरून पुढे सरसावत राहिल्या !
राजाची जखम चिघळवत राहिल्या !!
राजाच्या शरीराचे तापमान वाढत गेले !!!
आणि शेवटी राजा हे पुटपुटत मरून गेला की
अखेर राज्यात मुंग्या आहेत तरी किती????
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
राजा को वरदान है
उसे कोई मार नहीं सकता.
लेकिन साथ ही एक चेतावनी भी है,
उसे छोटे छोटे घावों से बचना होगा.
इन घावों में अगर चीटियां लग गयी
तो राजा को कोई नहीं बचा पायेगा.
राजा के पैरों तले अनेक चीटियां कुचली जाती
कभी राजा उन्हें गुस्से में कुचलता
कभी प्यार में
और कभी कभी तो यूं ही.
चीटियां परेशान थी
उन्हें राजा के घाव का इंतजार था,
ठीक उसी तरह जैसे सांप के घाव का इंतजार रहता है चीटियों को.
एक दिन राजा ने ऐलान किया कि
उसे एक ही रंग पसंद है
बाकी रंग या तो राज्य छोड़ दे, या अपना रंग फीका कर लें.
राज्य में अफरा-तफरी मच गई
कुछ ने राजा की बात मानते हुए अपना रंग फीका कर लिया,
कुछ ने अपना रंग चटकीला बनाये रखने की भरसक कोशिश की.
और इस जुर्म में जेल भी जाते रहे.
राजा के पैरों तले कुचले भी जाते रहे.
लेकिन कुछ रंग भूमिगत हो गए
राजा के खिलाफ विद्रोह का बिगुल फूंक दिया
राजा ने भी इनके खिलाफ अपनी पूरी सेना उतार दी.
लेकिन भयानक दमन के बावजूद
विद्रोहियों ने राजा को एक छोटा घाव दे ही दिया
चीटियों को इसी बात का तो इंतजार था.
चीटियों ने पंक्तिबद्ध होकर राजा के घाव पर हमला बोल दिया
राजा और उसके निजी सैनिक
चींटियों को मारते रहे!
लेकिन चींटियों की पंक्ति तो अंतहीन थी
दरवाजे, खिड़की सब बन्द कर दिए गए
लेकिन
कभी रोशनदान से, किवाड़ों की झिर्रियों से, तमाम सुराखों से
चीटियों का संकल्पबद्ध काफिला आगे बढ़ता ही रहा
चीटियां मरती रही,
दूसरी चीटियां मरती चीटियों के ऊपर से आगे बढ़ती रही!
राजा के घाव को गहरा बनाती रही!!
राजा के शरीर का तापमान बढ़ता रहा!!!
और अंत मे राजा यह बुदबुदाते हुए मर गया
कि आखिर राज्य में कितनी चीटियां है????
©मनीष आज़ाद
Manish Azad