देवाची जात

देवाची जात

देवाची जात

नातवाला शिकवताना आजीने सांगितले,
'आपण सगळे जगातले लोक त्या देवाची म्हणजेच परमपित्याची लेकरे आहोत.'
'आजी!देवाची जात कुठली गं?'
'देवाची जात?'आजी अडखळली.
'हो,जशी आपली जात ब्राह्मण आहे,
तुच सांगितलं होतं.तसंच देवाची जात कुठली? 
ते सांग.'
'देवाची कुठलीही जात असत नाही'
आजीला हेच उत्तर सुचलं.
'जर देवाची कुठली जात नसेल तर त्याच्या लेकरांची एखादी जात कशी काय असू शकते बरं?'

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी लघुकथा

ईश्वर की जाति 

पोते को पढ़ाते हुए दादी ने बताया, 
"हम सब संसार के लोग उस 
परमपिता परमेश्वर की संतान हैं।"
"दादी! ईश्वर की जाति क्या है?"
"ईश्वर की जाति?" दादी अचकचा गई।
"हाँ, जैसे हमारी जाति ब्राह्मण है, 
आपने ही बताया था। वैसे ही ईश्वर की जाति क्या है?"
"ईश्वर की कोई जाति नहीं होती।" 
दादी को यही जवाब सूझा।
"अगर ईश्वर की कोई जाति नहीं होती तो 
उसकी संतान की कोई जाति कैसे हो सकती है?"

©हरभगवान चावला
Harbhagwan Chawla 
               
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने