गाव आणि बिबट्या

गाव आणि बिबट्या

गाव आणि बिबट्या

पूर्वी दरवर्षी गावात बिबट्या यायचा,
एक दोन महिने या इशार्‍यात जायचे की 
आज या बागेत पंजाच्या खुणा सापडल्या,
उद्या त्या तलावापाशी,
परवा दख्खन टोलेच्या शेतापल्याड 
आढळला बिबट्या.

या भीतीत अवघा गाव बंद मुठीप्रमाणे एकत्र व्हायचा.
हेच ते दिवस असत,
जेव्हा पाणी हे 
हिंदू पाणी,
मुस्लीम पाणी याऐवजी 
फक्त पाणी होत असे.

मशिद-मंदिर यांच्या दुआ-प्रार्थना 
एकसारख्या होऊन जायच्या.
या दिवसात कुणीही सरपंचांच्या चबुतर्‍यावर चप्पल घालून चढू शकत असे.

बिबट्या भेदभाव करत नसे
म्हणून बिबट्यामुळे सगळा गावदेखील आपले 
भेदभाव थांबवित असे.

सकाळी चरायला गेलेल्या गायींपैकी संध्याकाळी 
एक कमी आढळायची तर,
सगळा गाव लाठ्या आणि कंदील घेऊन निघायचा,
गायीचे अर्धवट खाल्लेले प्रेत मिळायचे आणि अवघा गाव एका सूरात रडायला लागायचा,
ते ही जे गाय खात असत,
ते ही जे गायीला पूजत असत.

रहमत अली जुलाहेची शेळी सोडविण्यासाठी 
पंडीताची सगळी पाठशाळा धावायची बिबट्यामागे.

या रडण्यामध्ये
या धावण्यामध्ये
तो एकोपा होता
ज्याचा सराव हा बिबट्या प्रत्येकवर्षी घडवून जायचा

मूळात सामाजिक भेदाभेद बिबट्याने नव्हे 
आपण बनवले होते
म्हणून बिबट्याच्या निघून गेल्याच्यानंतर
भेदाभेद आपापल्या जागा पुन्हा स्थापित व्हायचे
परंतू लोकांच्या हृदयात एक मवाळकी शिल्लक राहायची
सोबत बसणे शिल्लक राहायचे
आणि सोबत बसण्याने बिबट्याच काय,जगातल्या कुठल्याही मुद्याचा निकाल लावता येऊ शकतो

जुलाहेला पाहताच पोरं 'वालेकुम रहमत अली बकरीवाले' म्हणून आरडायची

आता सरपंच मत देण्याचा आदेश देण्याशिवायही 
मगरूचं कमीअधिक काय ते बघायचा.

आता गावात बिबटे येत नाहीत
पुढारी येतात,त्यांची द्वेषपूर्ण भाषणे येतात आणि 
बुलडोझरची शक्यता येते
जी गावाला आणखी जरा तोडून जाते प्रत्येकवेळेस.

मला वाटते की बिबट्याने आता,
माझ्या गावाच्या सामुहिक स्मृतीतून निघून जाऊन संपूर्ण देशात फिरावे.

मराठी अनुवाद 
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पहले हर साल गाँव में शेर आता था,
एक-दो महीने इन सूचनाओं में गुजरते की 
आज उस बाग में
पंजों के निशान मिले,
कल उस तालाब के पास,
परसों दख्खिन टोले के खेतों के पार देखा गया शेर।

इस डर में पूरा गाँव बन्द मुठ्ठी की तरह इकट्ठा हो जाता था।
यही वो दिन होते थे।
जब पानी, हिन्दू पानी, मुस्लिम पानी के बजाय
सिर्फ पानी हो जाता था।

मस्ज़िद-मंदिर की दुआएं-प्रार्थनाएं एक जैसी हो जाती थीं।
इन दिनों कोई भी सरपंच के चबूतरे पर चप्पल पहन के चढ़ सकता था।

शेर भेदभाव नहीं करता था
तो शेर की वजह से पूरा गाँव भी अपने भेदभाव स्थगित कर देता था।

सुबह चरने गयीं गायों में से शाम को एक कम मिलती तो,
पूरा गाँव डंडे और लालटेनें लेकर निकल पड़ता।
गाय की आधी खाई लाश मिलती।
और पूरा गाँव एक स्वर में रो पड़ता,
वे भी जो गाय खाते थे वे भी जो गाय पूजते थे।

रहमत अली जुलाहे की बकरी छुड़ाने के लिए,
पंडित जी की पूरी पाठशाला दौड़ गई शेर के पीछे।

इस रो पड़ने में, इस दौड़ जाने में वह एकता थी 
जिसका अभ्यास यह शेर हर साल करा जाता था।

चूंकि सामाजिक भेदभाव शेर ने नहीं
हमने बनाये थे तो,
शेर के जाने के बाद
भेदभाव अपनी जगह फिर ले लेते थे
लेकिन लोगों के दिनों में एक नरमाई बची रह जाती थी।
साथ बैठना बचा रह जाता था,
और साथ बैठकर शेर तो क्या,
दुनिया के किसी भी मसले से निपटा जा सकता है।

जुलाहे को देखते ही बच्चे "वालेकुम रहमत अली बकरी वाले" चिल्लाने लगते थे।

कि अब सरपंच वोट देने का आदेश देने के अलावा भी मगरू का हालचाल ले लेता था।

अब गाँव में शेर नहीं आते।
नेता आते हैं, उनके नफ़रती भाषण आते हैं,
और बुलडोज़र की आशंकाएं आती हैं।
जो गाँव को थोड़ा और तोड़ जाती हैं हर बार।

मैं चाहता हूँ वह शेर अब, 
मेरे गाँव की सामूहिक स्मृति से निकल कर
पूरे देश में घूमे।

©रचित
Rachit 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने