आम्ही ज्यांना माय म्हटलं !

आम्ही ज्यांना माय म्हटलं !

आम्ही ज्यांना माय म्हटलं

आम्ही नदीला माय म्हटलं
आणि ती प्रदूषीत करीत राहिलो

आम्ही गायीला माय म्हटलं
आणि तिला पिळून सोडून दिले

आम्ही पृथ्वीला माय म्हटलं
राहाण्यालायक नाही ठेवली पृथ्वी

आम्ही भारताला माता म्हटलं
विभागून टाकली द्वेषात तिची लेकरे

आम्ही आईच्या सन्मानार्थ कविता रचल्या
आणि आईला काशीला सोडून आलो

असे सगळे असूनही आम्ही
संस्कृतीची स्तुतीगीतं गाणारी
श्रेष्ठ अपत्ये बनून राहिलो

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

हमने जिन्हें मां कहा

हमने नदी को माँ कहा 
और गन्दला करते रहे

हमने गाय को माँ कहा
और दूह कर छोड़ दी

हमने धरती को माँ कहा
रहने लायक नही छोड़ी धरती

हमने भारत को माँ कहा 
बांट दी नफरतों में उसकी संताने

हमने मां की शान मे काव्य लिखे
और मां को बनारस छोड़ आये

इन सबके बावजूद हम
संस्कृतियों के स्तुतिगान गाती
श्रेष्ठ संताने बनी रही

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने