🚩
सनातन्यांची वकिली।
लाज-शरम विकलेली।
ठो ठो बोंब ठोकली।
सदाशिवपेठी।।१।।
जातीपातीची उतरंड।
पाळती आजही अखंड।
माणुसकीला पाखंड।
ठरविती जे।।२।।
चिकित्सा जो करेल।
वर्णव्यवस्थेला ठोकरेल।
त्यांवर मग तुटून पडेल।
झुंड कुत्र्यांची।।३।।
समतेचे यांसी वावडे।
विषमतेचे गाती पवाडे।
कर्तृत्वासी वेंगाडून थोबाडे।
वाकुल्या दाविती।।४।।
भावे असो वा चितळे।
जातहितासाठी तळमळे।
कुणी जर का खरे बोलले।
झोंबते मिरची।।५।।
ओकते नित्य घाण घृणेची।
खुनशी पिलावळ नथ्थुची।
सर्वसमावेशक वृत्तीची।
उडविती टर।।६।।
मंदिरांनी पोसलेले हे वळू।
संविधाननिष्ठतेला पाहती गिळू।
जातीश्रेष्ठत्वाचा मिरविती गळू।
निर्लज्जपणे।।७।।
वारकरी संत ते सांगती।
मंबाजीची जळो संगती।
ज्ञाना-तुकयाची नक्कल करती।
अभंगबुडवे।।८।।
दिसेल त्यांवरी थुंकत सुटती।
समाजमाध्यमी बडवे मातती।
भक्ताडांची जन्मजात विकृती।
संपेचि ना।।९।।
मनुष्यता हाच धर्म खरा।
नको भेदाभेदाचा व्यर्थ पसारा।
द्वेष-तिरस्काराचा कचरा।
जाळुनि टाकू।।१०।।
🚩
-भरत यादव
Bharat Yadav
फारच झोंबणारे सत्य आहे . अप्रतीम
उत्तर द्याहटवा