धम्मविचार

धम्मविचार

धम्मविचार

'...धम्म हे क्रांतीचंच तत्त्वज्ञान आहे.धम्म हे धर्मातीत जीवनशैलीचंच महान नीतीशास्त्र आहे.बाबासाहेबांच्याच सिध्दान्तानुसार या इहवादी,विज्ञाननिष्ठ आणि संपूर्ण समतेच्या तत्त्वज्ञानाला धर्म म्हणता येत नाही.बुध्द महान आणि तत्त्वज्ञानी माणुसच होते.ते कोणाचाही अवतार नव्हेत.प्रेषित नव्हेत.ते स्वतःसकट सर्वांच्याच चिकित्सेची दारं सतत उघडून देणारे क्रांतिमानवच आहेत हे बाबासाहेबच सांगतात.त्यांचं हे तत्वज्ञान माणसाला कोणत्याही प्रकारच्या पराधीनत्वाकडे,परावलंबित्वाकडे,
लाचारीकडे किंवा निष्क्रियतेकडे जाण्यापासून रोखणारं तत्त्वज्ञान आहे.माणसानं धार्मिक होऊ नये,कर्मकांडी होऊ नये आणि माणसानं चिकित्साशून्य होऊ नये,यासाठी बाबासाहेबांनी धम्म दिला.धम्म म्हणजे विज्ञाननिष्ठा.धम्म म्हणजे असीम माणुसकीचं प्रीअॅम्बल!धम्म हा क्रांती या शब्दाचा पर्यायी शब्दच आहे.देवभोळा, नियतीवादी,तीर्थयात्रा करणारा,बाबा-बुवांना डोक्यात वागवणारा माणूस बाबासाहेबांच्या क्रांतिविचारांशी नाते जोडूच शकत नाही....'

   ----डाॅ.यशवंत मनोहर
(पुनर्रचनेचे पडघम     पान क्र.३१)

.................................

.....'अत्तदीप' हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार आहे.हा जीवन जगण्यासाठी माणसाला लायक बनविणारा उपदेश आहे.स्वतःच्या प्रत्येक कृतीची,जणू काही स्वतःच्या प्रत्येक श्वासाची, जबाबदारी माणसाने स्वतःच घेतली पाहिजे,हे शिकविणारा,खरे तर जीवनाला प्रसन्नपणे,निर्भयपणे सामोरे जाण्याचे धैर्य देणारा संदेश आहे.
                      आपला धम्म कितीही उपकारक असला,तरी तो तराफ्यासारखा असल्यामुळे पैलतीराला पोचल्यानंतर त्याला चिकटून बसू नका, असे तथागतांनी सांगितले.त्यामुळेच 'धम्मशरण व्हा' असे सांगताना त्यांनी 'आत्मशरण व्हा' असेही आग्रहाने सांगितले.त्यांनी धम्म सांगितला असला आणि त्या धम्मामुळे जगण्याचा मार्ग कळत असला, तरी त्या मार्गावरुन चालण्याची जबाबदारी मात्र ज्याची त्याचीच आहे,हेही वारंवार सांगितले...'

   ----डाॅ.आ.ह.साळुंखे
(सर्वोत्तम भूमिपुत्रःगोतम बुध्द  
पान क्र.२०५)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने