मी मरणाला घाबरतो
शौर्याचे किस्से सांगताना
विद्वान दिसण्याकरिता
मी खूप सारी पुस्तकं
खरेदी केली आहेत
मी कविता लिहिताना
शब्दांचा तोल जपण्याकडे
विशेष लक्ष देतो
मी जेव्हा दुःख पाहातो
तेव्हा दुःखी होण्याचे
नाटक करतो
मी लागोपाठ अभिनयरत आहे
मी जो आहे
तो मी अजिबात नाही
बघा आजदेखील..!!
मी प्रेतांच्या या शहरात
जिवंत असल्याचा अभिनय करतो आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मैं मौत से डरता हूं
बहादुरी के किस्से सुनाते हुए
विद्वान दिखने के लिए
मैने ढेर सारी किताबें खरीद रखी हैं
मैं कवितायें लिखते हुए
शब्दों के संतुलन का खास ध्यान रखता हूं
मैं जब दुःख देखता हूं
तो दुखी होने का नाटक करता हूं
मैं लगातार अभिनय में हूं
मैं जो हूं
वो मैं बिल्कुल नहीं हूं
देखना आज भी..!!
मैं मुर्दों के इस शहर में
जिंदा होने का अभिनय कर रहा हूं।
©Ashok Kumar
अशोक कुमार