तुम्ही पंक्चरवाला म्हणत
शिवी देण्याचा प्रयत्न करत असता
देशातील मुसलमानांना
कारण,
तुम्ही शतकानुशतके
कामाच्या नावावरून तर
शिवी देत आला आहात.
कधी कुणाला
मैला उचलण्यासाठी भाग पाडून
भंगी नाव दिलंत
गाई-म्हशीवाल्यांना
गवळी अडाणी म्हटलंत-
तुम्ही तुमचे केस कापून घेतलेत
आणि न्हावी म्हणत हाक मारलीत
तुमच्या पायांचा उन्हापासून
बचाव करणार्यांना
तुम्ही म्हटलंत चांभार
तुम्ही दिलेली नावं
आमची ओळख बनून गेली-
मग तुम्ही त्या ओळखीलाच
शिवी बनवलंत
कारण
तुमच्या डोळ्यात खुपत होते
कष्टाने भाकरी कमावणारे लोक.
प्रत्येक काम जे तुमचे
नाजूक हात करू शकत नव्हते
ते शिवीच्याच तर लायकीचे होते
हीच खोड आहे तुमची
म्हणून
ही पंक्चरवाली शिवी
तुम्ही एका धर्माला दिली आहे-
पण जात आणि काम आणलंत मध्ये
अखेर जातीची सवय
जाते कुठे?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पंचर वाला मुसलमान
आप पंचर वाला बोल कर
गाली देने की कोशिश
करते हैं
मुल्क के मुसलमानों को
क्योंकि
आप सदियों से
काम के नाम पर ही तो
गाली देते आये हैं।
कभी किसी को
मल उठाने पर मजबूर कर
भंगी नाम दे दिया
गाय-भैंस वाले को
ग्वाला गंवार बोल दिया-
आपने अपने बाल कटवाए
और नाई कह कर पुकारा।
आपके पैरों को धूप से
बचाने वालों को
कहा आपने चमार।
आपके दिए नाम
हमारी पहचान बन गए-
फिर आप ने उस पहचान को ही
गाली बना दिया।
क्योंकि
आपकी आंखों में
चुभते थे
मेहनत से रोटी कमाते लोग।
हर वो काम जो आपके
कोमल हाथ नहीं कर सकते थे
वो गाली के ही तो लायक थे।
यही आदत है आपकी
इसलिए
ये पंचर वाली गाली
अपने एक मज़हब को दी है-
पर जात और काम ले आये बीच में।
आखिर जाति की आदत
कहाँ ही जाती।।
©किताबगंज
Kitabganj