नांगर चालवणं माझ्या नागरीकत्वात सामील आहे
आणि नांगर उचलणंदेखील माझंच
नागरीकत्व होय.
आम्ही शतकानुशतकांपासून काढला
आहे असाच नांगरापासून तोडगा.
माझ्या शेतांमध्ये जे डोलतं आहे
ते माझं नागरीकत्व आहे.
माझ्या नागरीकत्वाचं पिक कापणार्यांना
आता समजून घ्यावं लागेल,
जेव्हा हिरव्या गवतावर धावतील
नीळे घोडे
तेव्हा धूळीत सगळं तण उडून जाईल.
-----------
शेतकर्यांच्या संघर्षाला अर्पण
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मेरी नागरिकता
हल चलाना मेरी नागरिकता में शामिल है
और हल उठाना भी मेरी ही नागरिकता है.
हमने सदियों से निकाला है इसी तरह हल से हल.
मेरे खेतों में जो लहलहाती है मेरी नागरिकता है.
मेरी नागरिकता की फ़सल काटने वालों को
अब समझना होगा, जब हरी घास पर दौड़ेंगे नीले घोड़े
तब धूल में सारे खरपतवार उड़ जाएंगे.
©फरीद खान
Farid फ़रीद Khan ख़ाँ
................................................
किसानों के संघर्ष को समर्पित.