जेव्हा बाजारात मिठासारख्या
किरकोळ जिन्नसा महाग व्हायला लागतात
तेव्हा समजा की आता
सत्ता आपल्या चवीवर हल्ला चढवणार आहे
जिन्नसांवर इतका कर वाढेल की
त्या खरेदी करणे होईल दुरापास्त
अशावेळी त्रासदायक दिवसांची सुरूवात
व्हायला लागते
स्वयंपाकघरात भांड्यांचा खणखणाट
कमी होत जाणे हा कुठल्या ना कुठल्या तरी
संकटाचा संकेत होय
ज्या वस्तुंना आम्ही निर्माण केलेय
त्या बाजारात पोहोचल्यानंतर आम्हांला
ओळखण्यास नकार देत असतील तर खरे माना
दलाल-आडत्यांनी
त्यांचा स्वभाव बदलवून टाकला आहे
आमचे धान्य पिकले नव्हते
त्याच्या आधीच त्यांची गोदामे
बांधून तयार होत होती
गावोगावी फिरत होते दलाल
ज्या लोकांना आम्ही शेताच्या
राखणदारीसाठी निवडले होते
ते सौदेबाजांच्या हाती विकले गेले आहेत.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जब बाजार में नमक जैसी
मामूली चीजें महंगी होने लगे
तो समझिए कि हुकूमत हमारे
स्वाद पर हमला करनेवाली है
चीजों पर इतना महसूल बढ़
जाय कि
उसे खरीदना हो जाय मुश्किल
ऐसे में तकलीफ के दिन शुरू
होने लगते हैं
रसोईघर में बर्तनों की खटर-पटर कम
होने लगे तो यह किसी न किसी
संकट का संकेत है
जिन चीजों को हमने पैदा किया है
वे बाजार में पहुंचने के बाद हमें
पहचानने से इनकार कर दे तो
सच मानिए बिचौलियों ने उनके
स्वभाव को बदल दिया है
हमारे अनाज पैदा नही हुए थे
उसके पहले उनके गोदाम बनने
लगे थे
गांव गांव घूमने लगें थे
दलाल
जिन लोगों को हमने खेत की
रखवाली के लिए चुना था
वे सौदागरों के हाथ बिक
चुके हैं
©स्वप्निल श्रीवास्तव
Swapnil Shrivastav
Art
by Kamal koria