दोन्ही पायडल वडिलांचे पाय आहेत
टायर वडिलांचे बूट
मुठी त्यांचे हात
कॅरीयर त्यांची पिशवी
रोज जात असते
त्यांना घेऊन
आणि आणते लादून
गात गात विहरत विहरत
कुठल्याही हेडलाईटशिवाय देखील
ती गुडुप्प अंधारात
शोधते आपली वाट
आणि वळते घराच्या दिशेने
दररोज रात्री वडिलांना
घरापर्यंत सोडून
मग स्वतः झोपी जाते सायकल
भुकेल्या भिंतीला खेटून
सायकल
जी वडिलांची पक्की सोबतीण आहे
कुण्या पेट्रोलपंपापर्यंत जात नाही
कुठले पेट्रोल नाही पीत
जिचे अक्षय्य इंधन
लपलेय वडिलांच्या पावलात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
🍁
मूळ हिंदी कविता
दोनों पैडल पिता के पाँव हैं
टायर पिता के जूते
मुठिया उनके हाथ
कैरियर उनका झोला
हर रोज़ जाती है
उन्हें लेकर
और लाती है लादकर
गाते हुए लहराते हुए
बिना किसी हेडलाइट के भी
वह घुप्प अँधेरे में
चीन्ह लेती है अपनी राह
और मुड़ जाती है घर की ओर
हर रात पिता को
घर तक छोड़कर
फिर ख़ुद सोती है साइकिल
भूखी दीवार से सटकर
साइकिल
जो पिता की अभिन्न साथी है
किसी पेट्रोलपंप तक नहीं जाती
कोई पेट्रोल नहीं पीती
जिसका अक्षय ईंधन
छिपा है पिता के पाँव में ।
©संदीप तिवारी
Sandeep Tiwari
विश्व साइकिल दिवस