नाही देऊ पाहात मी
तुला कुठले संबोधन
तू कुठल्याही संबोधनापेक्षा मोठा आहेस
तुझे नावच सर्वात प्रिय आहे मला
त्यामुळे हे मार्क्स!
आज तुझ्या जन्मदिनी
द्याव्या म्हणतेय तुला
बातम्यांच्या तीन भेटी
पहिली बातमी आहे स्वीडनहून
शोषितांहूनही शोषित
जगातल्या पहिल्या शोषित स्त्रीविषयी
वेश्यावृत्ती आता मानली गेलीये तिथे
महिला आणि मुलांविरूद्धची सामाजिक हिंसा
असहायतेपोटी देहविक्रय करणारी बाई नव्हे
शरीर खरीदणारा पुरूष आणि समाजदेखील ठरवला गेलाय तिथे अपराधी
सरकारनेच मान्य केली आहे
ही आपली जबाबदारी असल्याचे
आणि पाहा!
बघता बघता हा असाध्य असा रोग
आता वाटू लागलाय एक साध्य आजार
आणि,
दूसरी बातमी आहे तुर्कस्थानामधून
येणार्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे सर्व साडेपाचशे उमेदवार असणार आहेत महिला
हा कुठला महिला अस्मितेचा
वा सामाजिक संतुलनाचा विषय नाही,
शोषक समाजाविरुद्ध
विचारपूर्वक घेण्यात आलेला निर्णय आहे हा
तिथल्या कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे की महिलाच होत्या नेहमी
सर्वात पुढे
नाकारली होते त्यांनी आपल्या नावावर लिहिलेली सगळी जुनाट संबोधने
भ्याल्या नव्हत्या त्या अश्रूधुराला
घाबरल्या नव्हत्या पोलिसांच्या गोळीला आणि काठीच्या माराला
हादरवून सोडले होते त्यांनीच शासनकर्त्यांना
त्याच तर आहेत दररोजच्या शोषिता
सर्वाधिक शोषक,क्रूर सत्ताधिशांच्या
त्यामुळे
त्यांनाच,फक्त त्यांनाच बनविण्यात आलेय उमेदवार
तिसरी बातमी फिनलंडहून
इथे रचला गेलाय एक नवा इतिहास
जगातली सर्वात तरुण प्रधानमंत्री बनली आहे एक महिला!
सना मरीन!
एवढेच नाही तर या आघाडी सरकारमध्ये सहभागी सर्व चार पक्षांचे नेतृत्वदेखील महिलांच्या हाती आहे!
आहेत ना जोरकस बातम्या!
आज तुझ्या जन्मदिनी
स्विकार कर आमच्या या भेटींचा.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
आज कार्ल मार्क्स के जन्मदिवस पर
जन्मदिन का उपहार
नहीं देना चाहती
तुम्हें कोई संबोधन
तुम हर बोधन से बड़े हो
तुम्हारा नाम ही सबसे प्रिय है मुझे
इसलिये हे मार्क्स !
आज तुम्हारे जन्मदिवस पर
देना चाहती हूँ
ख़बरों के तीन उपहार
पहली खबर है स्वीडन से
शोषितों में भी शोषित
दुनिया की पहली शोषिता स्त्री के बारे में
वेश्यावृति अब मान ली गयी है वहाँ
औरतों और बच्चों के खिलाफ सामाजिक हिंसा
मजबूरी में देह बेचनेवाली औरत नहीं
देह ख़रीदने वाला पुरूष और समाज भी है अपराधी
सरकार ने ही मान ली है इसे
अपनी ज़िम्मेदारी
और देखो !
देखते ही देखते ये असाध्य सा रोग
अब लगने लगा है एक साध्य बीमारी
और,
दूसरी खबर है तुर्की से
आने वाले चुनाव में कम्युनिस्ट पार्टी की
सभी साढ़े पाँच सौ उम्मीदवार बनी हैं महिलाएँ
नहीं यह किसी महिला अस्मिता
या किसी सामाजिक संतुलन की बात
शोषक समाज के विरुद्ध
सोच-समझ कर लिया गया निर्णय है
कहना है वहाँ की पार्टी का
महिलाएँ ही रहीं थीं सबसे आगे
उलट दिये थे उन्होंने अपने नाम लिखे सारे पुराने संबोधन
नहीं डरी थी वे आँसू गैस से
नहीं डरी थी पुलिस की गोली और डंडे की मार से
हिला दी थी उन्होंने ही शासन की चूलें
वे ही तो हैं दैनन्दिन शोषिता
सबसे शोषक, निर्मम निज़ाम की
इसीलिये
उन्हें ही, सिर्फ उन्हें ही बनाया है उम्मीदवार !
तीसरी खबर है फ़िनलैंड से
यहाँ रचा गया है एक नया इतिहास
दुनिया की सबसे युवा प्रधानमंत्री बनी है
एक महिला ! सना मरिन !
इतना ही नहीं इस गठबंधन सरकार में शामिल
सभी चार दलों की बागडोर भी
महिलाओं के हाथ में है !
है न खबर ज़ोरदार !
आज तुम्हारे जन्मदिवस पर
स्वीकार करो हमारा यह उपहार ।
©सरला माहेश्वरी