काळ

काळ

काळ

हा पुस्तकांचे पाठांतर करण्याचा 
काळ आहे
कारण पुस्तकांना जाळण्याचा आदेश केव्हाही 
येऊन थडकू शकतो.
हुकूमशहाला ठाऊक आहे
भविष्य जाळण्याकरिता पुस्तके जाळणे गरजेचे आहे...

हा गाण्यांना स्मृतीत जपण्याचा
आणि त्यांना सामुहिकपणे गायिले जाण्याचा काळ आहे
कारण गाणेच अशी हाक आहे
ज्यात आपण भविष्याचे आवाहन करत असतो!
हुकूमशहा हे जाणतो 
त्यामुळे तो गाण्यांना आपल्या स्मृतींमधून कुरतडून टाकू पाहतोय...

हा प्रेम करण्याचा काळ आहे
कारण प्रेम करणे हे नेहमीच
प्रथा-परंपरांच्या विरूद्ध बंड पुकारणे ठरत आले आहे.
त्यामुळे प्रत्येक हुकूमशहा प्रेमापासून
टरकून असतो....

हा बातम्यांना समोरून नव्हे
पाठीमागून पाहण्याचा काळ आहे,
कारण हुकूमशहा आता वर्तमानपत्रांवर बंदी घालत नाही,
तर त्यात अॅसिड भरायला भाग पाडतो...

हा प्रश्नांना वाचविण्याचा,
रचण्याचा आणि त्यांना उसळविण्याचा काळ आहे.
कारण हुकूमशहाला माहित आहे
की हे प्रश्न त्याच्या उत्तरांच्या महागाथेच्या उडवू शकतात चिंधड्या...

हा युद्ध करताना,
युद्ध शिकण्याचा काळ आहे
कारण हुकूमशहा जाणतो की
तोपर्यंतच तो सुरक्षित आहे
जोपर्यंत युद्धावर त्याचा एकाधिकार आहे!!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

यह किताबों को कंठस्थ करने का समय है
क्योंकि किताबों को जलाने का आदेश 
कभी भी आ सकता है.
तानाशाह को पता है
भविष्य जलाने के लिए किताबें जलाना जरूरी है..

यह गीतों को याद रखने
और उनके समूहिक गान का समय है
क्योंकि गीत ही वह पुकार है
जिसमें हम भविष्य का आहवान करते हैं!
तानाशाह यह जानता है
इसलिए वह गीतों को हमारी स्मृतियों से
खुरच देना चाहता है..

यह प्रेम करने का समय है
क्योंकि प्रेम करना हमेशा से
रवायतों के ख़िलाफ़ विद्रोह रहा है.
इसलिए हर तानाशाह प्रेम से खौफ़ खाता है..

यह समाचार को सामने से नहीं, 
पीछे से देखने का वक़्त है,
क्योंकि तानाशाह अब समाचारों पर प्रतिबंध नहीं लगाता,
बल्कि उनमें तेज़ाब भरवाता है..

यह प्रश्नों को बचाने, गढ़ने और 
उन्हें उछालने का समय है.
क्योंकि तानाशाह जानता है
कि ये प्रश्न
उसके उत्तरों की महागाथा की उड़ा सकते हैं धज्जियां..

यह युद्ध करते हुए, युद्ध सीखने का वक़्त है
क्योंकि तानाशाह जानता है कि
वह तभी तक सुरक्षित है
जब तक युद्ध पर उसका एकाधिकार है!!

©मनीष आज़ाद
Manish Azad
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने