तो म्हणाला,
तू हसतेस अन् फुलं उमलतात.
ती हसली!
घरातला एक कप चहा आणि
तुझ्या चेहर्यावरचे हसू
अवघा थकवा घालवतात.
ती हसली!
आई,
तुझी उतरलेली चर्या
मला चांगली वाटत नाही.
ती हसली!
खूप चांगली आहे ती
सर्वांना आनंदी ठेवते,
लोक म्हणाले.
ऐकून ती हसली!
हरक्षणी हसणारी
ती विसरून गेली.
दुःखात रडायचं असतं!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
उसने कहा,
तुम हॅंसती हो तो फूल खिलते हैं
वह मुस्कराई!
घर की एक कप चाय और
तुम्हारी चेहरे की मुस्कान
सभी थकान हर लेती है
वह मुस्कुराई!
माॅं!
तुम्हारा उतरा हुआ मुॅंह
मुझे अच्छा नही लगता
वह मुस्कुराई!
बडी भली है वह
सबको खुश रखती है
लोगों ने कहा
सुनकर वह मुस्कुराई!
हर वक्त मुस्कराती
वह भूल गई
दुःख में रोया जाता है!
©रोशनी वर्मा
Roshani Verma