उमरसोबत त्याची आजी
आंधळी कोशिंबीर खेळत नाही.
मुहम्मद, तिच्या मुलासोबत ती खूपदा
आंधळी कोशिंबीर खेळायची.
तीन वर्षांचा मुहम्मद
अम्मीने विचारल्यावर की
'तू कुठं लपलायंस,
तो पटकन उत्तर द्यायचा
मी इथं आहे म्हणून' आणि
अम्मीला येऊन बिलगायचा.
आंधळी कोशिंबीर खेळता खेळता
तो तरूण झाला
अजूनही कधी कधी लपून बसायचा
अम्मी त्याला शोधून शोधून वैतागून जायची
कुठंयस तू?
पण आता कुठला आवाज येत नाही
अम्मी घाबरते,
तोच अचानक उडी मारून
तो अम्मीच्या पुढ्यात उभा ठाकायचा.
आता कधी असे करू नकोस,
माझं काळीज गलबलून जातं रे राजा!
आणि एक दिवस
तिचा मुहम्मद खरोखरच गायब झाला.
अम्मी शोधत राहिली,
विचारत राहिली,
कुठं लपलायंस तू?
पण कसलाच आवाज नाही!
पोलिस ठाण्यात गेली,
सैन्याकडे गेली,
मंत्र्यांच्या दरबारात माथा टेकला.
परंतू सगळ्यांना हेच वाटतं
की ती अजूनही आपल्या
मुलासोबत आंधळी कोशिंबीर खेळत आहे आणि
आम्हाला मात्र विनाकारण त्रास देत आहे.
तिनं चिनारला विचारलं तर
त्याची पानं शहारली,विखरून विखरून गेली.
झेलमला विचारलं,
जिच्या प्रवाहात ठाऊक नाही कुणाचं रक्त वाहात होतं.
सगळीकडे भितीदायक वातावरण होतं.
थकून भागून अखेरीस
ती त्या अज्ञात कबरींपर्यंत पोहोचली
ज्यावर अद्यापपर्यंत कुणीही फातेहा पढला नव्हता.
एका कबरीजवळ बसून,
तिने विचारले
मुहम्मद तू कुठंयस?
सगळ्या कबरींमधून एकाचवेळी आवाज आला
'अम्मी,मी इथं आहे....'
तिने चमकून चहूबाजूला पाहिले
मग दोन्ही हात वर उचलून हळू आवाजात बोलली,
या अल्लाह!
मी आंधळी कोशिंबीर खेळून
आपल्या मुहम्मदला घालवून बसले,
आता मुहम्मद तुझ्या हवाली आहे
तू कधी त्याच्यासोबत आंधळी कोशिंबीर खेळू नकोस!
कधी नाही!!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
उमर के साथ उसकी दादी
आइस पाइस नहीं खेलती.
बेटे मुहम्मद के साथ वह खूब आइस पाइस खेलती थी.
तीन साल का मुहम्मद
मां के पूछने पर कि तू कहाँ छिपा है,
वह झट जवाब देता
मैं यहां हूँ और माँ के सीने से लग जाता.
आइस पाइस खेलते खेलते वह जवान हुआ
अभी भी कभी कभी छिप जाता
मां खोजती हैरान रह जाती
कहां है तू
लेकिन अब कोई आवाज़ नहीं आती
माँ डर जाती
तभी अचानक कूद कर
वह माँ के सामने खड़ा हो जाता.
अब कभी ऐसा मत करना
मेरा दिल बैठ जाता है.
और एक दिन उसका मुहम्मद सचमुच गायब हो गया.
मां ढूढती रही
पूछती रही
कहां छिपा है तू
लेकिन कोई आवाज़ नहीं.
थाने गयी, सेना के पास गई,
मंत्रियों के दरबार में मत्था टेका.
लेकिन सबको यही लगता
कि वह अभी भी
बेटे के साथ आइस पाइस खेल रही है.
और हमें बेवजह परेशान कर रही है.
उसने चिनार से पूछा तो
उसके पत्ते सिहर कर बिखर गए.
झेलम से पूछा,
जिसमें न जाने किसका लहू बह रहा था.
हर तरफ़ ख़ौफ़नाक ख़ामोशी थी
थक हार कर अंत में
वह उन गुमनाम क़ब्रों तक पहुँची
जिन पर किसी ने
अभी तक फ़ातिहा नहीं पढ़ा था.
एक क़ब्र के समीप बैठकर, उसने पूछा
मुहम्मद तू कहां है
सभी क़ब्रों से एक साथ आवाज़ आयी
'मां, मैं यहां हूँ'...
उसने चौंककर चारों तरफ़ देखा
फिर दोनों हाथ ऊपर उठाकर धीमी आवाज़ में बोली
या अल्लाह!
मैंने आइस पाइस खेलकर
अपने मोहम्मद को खो दिया
अब मोहम्मद तेरे हवाले है
तू कभी उसके साथ आइस पाइस न खेलना!
कभी नहीं!!
©मनीष आज़ाद
Manish Azad
चित्रः
मीर सुहैल
Mir Suhail