आपले बोलणे भलेही
दहा वीस पन्नास लोकदेखील
ऐकत नसतील...
तरिही आपले म्हणणे
जोरकसपणे
लिहा....बोला
कदाचित होऊ शकते
एक दिवस
तुमची प्रत्येक गोष्ट
प्रत्येक शब्द
क्रांती आणेल
जसे कबीरांचे दोहे
जसा बुद्धांचा उपदेश
जशी गुरु नानकांची वाणी
जसे येशु ख्रिस्तांचे शांतपणे
सुळावर लोंबकळून
अहिंसात्मक क्रांतीचा संकेत देणे
जसे भगतसिंहांचे
फासावर लोंबकळत
बुलंद क्रांतीचा नारा
जसे चे गवेरा यांचे आरंभीचे
बाईक भ्रमण
आणि अखेरीस
भ्याडांच्या गोळ्यांचा सामना करतानाचे शेवटचे उद्गार
मला तर माराल....माझ्या विचारांना कसे मारू शकाल?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
आपकी बात चाहे..
दस बीस पचास लोग भी
न सुनते हो..
तब भी अपनी बात को
ठोक बजा कर..
लिखो.. कहो
शायद हो सकता है
एक दिन..
तुम्हारी हर इक बात..
हर एक शब्द..
क्रांति लाए...
जैसे कबीर के दोहे
जैसे बुद्ध के उपदेश..
जैसे गुरु नानक की वाणी..
जैसे क्राइस्ट का चुपचाप
सूली पर लटककर....
अहिंसात्मक क्रांति का संकेत देना
जैसे भगत सिंह का..
.. फांसी पर झूलते..
बुलंद इन्कलाब का नारा..
जैसे चे ग्वेरा का शुरुआती ..
.. बाइक भ्रमण,..
और अंत में..
कायरों की गोलियों का सामना करते
... उसके आख़री शब्द..
"मुझे तो मार दोगे.. मेरे विचारों को कैसे मार पाओगे"
©तन्मय वर्मा
Tanmay Verma