शाहनाज इमरानी

शाहनाज इमरानी

भावपूर्ण आदरांजली !

२०२० साली मध्य प्रदेश हिन्दी साहित्य सम्मेलन या
नामवंत संस्थेच्या निमंत्रणावरून पहिल्यांदाच मध्यप्रदेशात
राजधानी शहर भोपाळ ला जाण्याची संधी मिळाली होती.
माननीय पलाश सुरजन आणि नामवंत हिंदी कवी-अनुवादक माननीय मणि मोहन यांच्या प्रेमळ आग्रहामुळे हे शक्य झाले.
त्यावेळी अनेक हिंदी साहित्यिक,कवी लेखकांच्या
ओळखी झाल्या.शाहनाज इमरानी या कवयित्री या
मित्रांच्या मेळ्यातच भेटल्या.तत्पूर्वी मी त्यांच्या काही 
कविता मराठीत अनुवादीत केल्या होत्या.पण प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच होती,तसे मी हिंदीतील अनेक नामवंत साहित्यिकांना प्रथमच भेटत होतो.
निव्वळ अनुवादाच्या कामामुळे जुळलेले हे स्नेहबंध 
खूप समाधान देणारे होते,आहे.

आत्ता काही वेळापूर्वीच शाहनाज इमरानी यांच्या 
निधनाची धक्कादायक वार्ता कळली
आणि भोपाळमधील त्या आठवणी ताज्या झाल्या.
कर्करोगाशी झुंज देणार्‍या या कवयित्रीचा एकमेव 
काव्यसंग्रह 'दृश्य के बाहर' माझ्या संग्रही आहे.
जो 'दखल प्रकाशन' ने २०१५ साली प्रकाशित केला
होता.या संग्रहाला ज्येष्ठ कवी राजेश जोशी 
यांची प्रस्तावना आहे.
आपल्या डाव्या विचारसरणीच्या वडिलांबद्दल,
अब्बू बद्दल शाहनाज खूप हळव्या होत्या.
एका तरक्कीपसंद कवयित्रीला आज आपण मुकलो आहोत.त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांची वडिलांविषयीची एक कविता आपल्यापुढे ठेवतोय.
फादर्स डे चे ही निमित्त आहेच.
--------------------
'अब्बू'च्या आठवणीत

तुझ्या जाण्याच्या नंतर
तुझ्यासोबत गेलेला काळ आणि 
अनुभव बदलून गेले आठवणीत

तू सोडून गेलास माझ्याकरिता
आपल्या शब्दांमध्ये
खूप सारा प्रकाश आणि धैर्य
सामान्य माणसाच्या संघर्षाचा
लाल शाईने लिहिलेला मजकूर

काही काळानंतर वाटले
सर्वकाही सामान्य झाले आहे
पण सर्वकाही सामान्य होत नसते
तीच आहे असमानता आणि अन्याय
धर्म-जातीच्या नावावर घृणा
आणि पूर्वग्रहाचे तेच अंधार

आजही विकली जाते मेहनत
आजही घाम कलंकित आहे
आजही जुलूम करणार्‍यांची आणि
जुलूम साहणार्‍यांची तीच कहाणी आहे

तीच आहेत राजकीय भांडणे
आणि खुर्चीची खेचाखेच
कोण जिंकले आहे आणि 
कुणाचा झालाय पराभव
कधी थांबला आहे हा क्रम
लढायांची लांबलचक श्रृंखला

नगरे बदललीत महानगरांमध्ये
वेगाने कमी होत गेले अंतर
नवे युग नव्या तंत्रज्ञानाच्या यांत्रिक जगात 
माणूस सुद्धा यंत्र बनला
प्रत्येक दिवशी संवेदनेपासून दूर होत गेला

या अस्वाभाविक दिवसात
मी तुझ्या आठवणीत चालताना
खूप दूरवर आले आहे
हवामान बदलण्याच्या सूचनांसह.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अब्बू की याद में

तुम्हारे जाने के बाद
तुम्हारे साथ बीता समय 
और अनुभव
बदल गए स्मृतियों में

तुम छोड़ गए मेरे लिए 
अपने शब्दों में
बहुत सी रौशनी और साहस
आम आदमी के संघर्ष की
लाल स्याही से लिखी इबारत

कुछ समय बाद लगा 
सब कुछ सामान्य हो गया
पर सब कुछ सामान्य नही होता
वही है असमानता और अन्याय
धर्म-जाति के नाम पर नफ़रत
और पूर्वग्रह के वही अंधेरे

आज भी बिकती है मेहनत
आज भी है पसीना दाग़दार
आज भी जुल्म करने वालों और
जुल्म सहने वालों की वही कहानी है

वही है राजनैतिक झगड़े
और कुर्सी की खींचतान
कौन जीता है और किसकी हुई है हार
कब रुका है यह सिलसिला
जंगों की लम्बी है श्रृंखला

नगर बदले हैं महानगरों में
रफ़तार से कम होते गए हैं फ़ासले
नई सदी नई टेक्नोलाॅजी की मशीनी दुनिया में
आदमी भी मशीन हो गया
हर दिन संवेदना से दूर होता गया

इन अस्वाभाविक दिनों में
मैं तुम्हारी यादों में चलते हुए
बहुत दूर तक आ गई हूं
मौसम के बदलने की सूचनाओं के साथ।

©Shahnaz Imrani
शाहनाज़ इमरानी 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने