बापाचा दिवस

बापाचा दिवस

बापाचा दिवस

आज बापाचा दिवस
तर चला त्या वृद्ध बापाला आठवू
ज्याच्या मजूर मुलाला अनेक दिवसांपासून 
कुठलीच मजूरी मिळालेली नाहीये

आज बापाचा दिवस आहे
तर चला त्या शेतकर्‍याला आठवू
ज्याच्या पोराने पीक वाया गेल्यानंतर
कालच आत्महत्या केली आहे

आज बापाचा दिवस आहे
तर चला त्या बापाला आठवू
ज्याची किशोरवयीन लेक 
सामुहिक बलात्कारानंतर 
गुंडांकडून जाळली गेलीय

आज बापाचा दिवस आहे चला
तर त्या असहाय बापाला आठवू
ज्याने आपल्या निरागस लेकरांना
भुकेने तडफडत मरताना पाहिलेय

आज बापाचा दिवस आहे
चला तर त्या बापांनाही स्मरू
जे आयुष्यभर आपल्या मुलांच्या चेहर्‍यावर आनंदाची एखादी स्मितरेषाही नाही देऊ शकले

आज बापाचा दिवस आहे
चला तर मग या,
आपल्या त्या वडिलांना विचारू
ज्यांनी आमच्यासाठी
या तमाम बापांचे हक्क हिरावले आहेत

वडिलांना शुभेच्छा देण्यासोबत
त्यांचा आशिर्वाद घेण्याबरोबरच
वडिलांशी मोकळेपणाने संवाद 
साधण्याचाही हा दिवस आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पिता का दिन

आज पिता का दिन है 
तो आओ उस बूढ़े पिता को याद करें 
जिसके मजदूर बेटे को कई दिनों से 
कोई मजूरी नहीं मिली

आज पिता का दिन है 
तो आओ तो उस किसान को याद करें 
जिसके बेटे ने फसल बर्बाद हो जाने पर
कल ही आत्महत्या की है 

आज पिता का दिन है
तो आओ उस पिता को याद करें
जिसकी किशोरी बिटिया सामूहिक बलात्कार के बाद 
दबंगों द्वारा जला दी गई है

आज पिता का दिन है 
तो उस असहाय पिता को याद करें
जिसने अपने मासूम बच्चों को 
भूख से तड़प तड़प कर मरते देखा है

आज पिता का दिन है 
तो उन पिताओं को भी याद करें
जो जीवन भर अपने बच्चों के चेहरों पर 
ख़ुशी की एक हल्की सी मुस्कान भी ना दे सके 

आज पिता का दिन है 
तो आओ अपने उन पिताओं से पूछें
जिन्होंने हमारे लिये 
इन सब पिताओं के हक मारे हैं 

पिता को शुभकामनाएं देने 
और उनसे आशीष लेने के साथ साथ
पिता से खुलकर संवाद करने का दिन भी तो है ये ।

©राजहंस सेठ
rajhans seth

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने