भारत
त्याने अशी कधी इच्छा नाही धरली
नसायलाच हवा होता तो
आम्ही घोषणांना काचेप्रमाणे वितळवून घातले आहे
त्याच्या कानात
तो आपलाच चित्कार ऐकू न शकण्याच्या
अस्वस्थतेत आहे
शतकांपूर्वी जिथे
मशिदी उभ्या करण्यात आल्या
मंदिरं बनवली गेलीयत
त्यांच्याखाली धानाच्या लोंब्या
गव्हाचे दाणे आणि
कपाशीची रोपं
दबली गेलीयत
आपली पिढी संस्कृतीच्या या हत्येची
मूक साक्षीदार आहे
धार्मिक झेंड्यांनी केलेय
मनुष्य जातीला नागवे आणि
आपल्या आधुनिकतेनं त्या नागवेपणाला
बौद्धिकतेचं आंगडं-टोपडं नेसवलं आहे
ते थंडीत गारठून जातं
उन्हाळ्यात जळतं आणि
निवडणूकीत खाक होऊन जातं
तो चौकातला वठलेला वड आहे
ज्याच्या सावलीत पांथस्थ थांबत नाही
व्यापारी थांबतो आणि
एखाद्या इमारतीसाठी दरवाजे मोजतो
तो झुंडीच्या पायदळी चिरडला
गेलेला देह आहे
ज्यावर चिन्ह आहे राष्ट्रवादाचे
डाग आहेत धर्मांधतेचे आणि
वाहणारे रक्त आहे माणूसपणाचे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
भारत
वह ऐसा कभी नहीं चाहता था
ना होना था उसे
हमने नारों को सीसे की तरह पिघला कर डाल दिया
उसकी कानों में
वह अपनी ही चीख़ को न सुन पाने की बेचैनी है
सदियों पहले जहाँ मस्जिदें खड़ी की गईं
मंदिरें बनाई गईं
उनके नीचे धान की बालियाँ, गेहूँ के दाने और
कपास के पौधे दबे हैं
हमारी पीढी सभ्यताओं की इस हत्या का
मूकबधिर गवाह हैं
मजहबी झंडों ने किया है आदम जात को नंगा,और हमारी आधुनिकता ने उस नंगेपन को बौद्धिकता का चोला
पहनाया है
वह सर्दियों में ठिठुरता है, गर्मियों में जलता है और
चुनाव में ख़ाक हो जाता है
वह चौराहे पर सूखा हुआ बरगद है
जिसके छाँव में राहगीर नहीं रुकता,
व्यापारी रुकता है और किसी इमारत के लिए
दरवाजे़ गिनता है
वह भीड़ के पैरों तले कुचली हुई देह है
जिसपर निशान है राष्ट्रवाद के
धब्बे हैं धर्मांधता के और बहता खून है आदमियत का।
©Aditya Rahbar
आदित्य रहबर