शरयूनदीत चुंंबनावर बंदी आहे!

शरयूनदीत चुंंबनावर बंदी आहे!

शरयूनदीत चुंबनावर बंदी आहे!

शरयू नदी 
एक तीर्थस्थळ आहे
निश्चितच
शापित आहे शरयू नदी
निश्चितच शरयूचे पाणी
जाणव्यासाठी निषेधार्ह आहे
आहे तर ते तीर्थस्थळच

शरयू 
श्री रामाच्या असहनीय
विरहाची गाथा आहे
स्त्री विरहाला गौरवाने सामोरी जाते
पुरुष देव असो
किंवा चक्रवर्ती सम्राट असो 
तरीही तो सहन करू शकत नाही विरह

शरयू
तीर्थस्थळ आहे
निश्चितच ती
विरहकथेचा ग्रंथ आहे

शरयूतीरावर
सूचनाफलक लावा
की सपत्नीक नदीत उतरण्यास मनाई आहे आणि पत्नीबद्दल प्रेम दाखवणे यावर तर कडकडीत बंदी आहे
कारण शरयू प्रेमाची नव्हे विरहाची प्रतिक आहे

रामसेवकांनो
तुम्ही विसरू नकात आपली कर्तव्ये
कुणी चुकून जरी चुंबन घेतले पत्नीचे
तर आठवण करून द्या त्याचवेळी
की आम्ही रामभक्त 
श्रीरामाला अनुसरतो, प्रेमाला नव्हे
आठवून करून द्या त्या जोडप्याला
की विरहनदीत प्रेम करण्यास मनाई आहे
शरयू नदीत चुंबन घेणे
हा अपवित्र गुन्हा आहे
कारण
संस्कृती आणि धर्म
प्रेमामुळे धोक्यात आलेत
घृणेमुळे नव्हे!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

सरयू नदी में चूमना मना है

सरयू नदी
एक तीरथ है
बेशक शापित है सरयू नदी
कि बेशक
सरयू का जल यज्ञपवीत के लिये निषेध है 
है तो तीरथ

सरयू
श्री राम के अहसनीय वियोग की गाथा है
कि स्त्री 
वियोग को गरिमा से जी जाती है
पुरुष
ईश्वर भी हो
चक्रवर्ती सम्राट हो
तब भी
सह नही पाता वियोग

सरयू
तीर्थ है 
बेशक वह
वियोगकथा का ग्रंथ है

सरयू के किनारे
सूचनापट लगाओ
कि सपत्नीक नदी में उतरना मना है
और पत्नी से प्रेम दर्शाना तो
क़त्तई मना है
कि सरयू
प्रेम की नही विरह की प्रतीक है

राम सेवकों
तुम भूलना मत अपने कर्तव्य
कि कोई भूल से भी चूम ले पत्नी
तो याद करवा देना उसी वक्त
कि हम राम भक्त श्रीराम का अनुसरण करते हैं
प्रेम का नही
याद करवा देना युगल को
कि विरह नदी में
प्रेम करना मना है
सरयू नदी में चूमना
जघन्य अपराध है
कि
संस्कृति और धर्म
प्रेम की वजह से खतरे में हैं
नफरत की वजह से नही।

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने