वडिलांना खांदा देताना मुलगा
जेव्हा सोडून येतो अंतिम शरणस्थळी
तो फक्त वडिलांना सोडून येत नसतो तेव्हा
आपले आभाळ सोडून येतो तिथे
जे स्पर्शू शकत असे आजवर तो
हवे तेव्हा
ज्यातून तारे घेऊन आपला खिसा भरू
शकत असे
ज्यातून उष्णता घेऊन शेकू शकत असे
आपले गारठलेले आयुष्य
वडिलांना जेव्हा सोडून येतो मुलगा
अंतिम शरणस्थळी
तो तेव्हा
एक डेरेदार वृक्ष अंगणातून उखडून
ठेवून येत असतो तिथे
ज्याच्या सावलीत बसायचा तो नेहमी
फळे घ्यायचा ज्याची गोड,पिकलेली
तो शाळा सोडून येत असतो एक चालतीबोलती
जी आपल्या जखमांनी घावांनी
शिकवत असते समजावत असते
धडपडण्यापासून बचावण्याचे
आपले अनुभव सांगत असते
तो पडताच हात देऊन उचलून घेते
जखमा भरण्याचे आपण शोधलेले
मलम लावत असते
वडिलांना जेव्हा सोडून येतो मुलगा
अंतिम शरणस्थळी
त्याला वाटते
त्याचा सगळा आसरा आता
उघडा बोडका झाला आहे
जिथे थेट डोक्यावर कोसळतो पाऊस
आणि रणरणते ऊन
वडिलांना जेव्हा सोडून येतो मुलगा
अंतिम शरणस्थळी
वडिलांचे उघडे डोळे बंद होतात
मुलाचे डोळे उघडायला लागतात
डोळ्यात मात्र तेव्हा धूर भरायला लागतो
त्याला ज्यावेळी
सर्वात अधिक गरज असते वडिलांची
मात्र
वडिल समोर राख होत असतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पिता को कंधा देते हुए
पिता को कंधा देते हुए पुत्र
जब छोड़ आता है अंतिम शरणस्थली
वह सिर्फ पिता को नही छोड़ आता तब
अपना आसमान छोड़ आता है वहाँ
जिसे छू सकता था वह जब चाहे
जिससे तारे ले अपनी जेब भर सकता था
जिससे ऊष्मा ले ताप सकता था सर्द जीवन
पिता को जब छोड़ आता है पुत्र
अंतिम शरण स्थली
वह तब
एक घना वृक्ष आंगन से उखाड़ कर
रख आता है वहां
जिसकी छांव में बैठता था अक्सर
फल लेता था जिससे मीठे, पके हुए,
वह स्कूल छोड़ आता है एक चलता हुआ
जो अपनी चोटों, घावों से
सिखाता है, समझाता है,
गिरने से बचने के अपने अनुभव बताता है
वह गिरते ही हाथ देकर उठा लेता है
घाव भरने की अपनी ईजाद की गई मरहम लगाता है
पिता को जब छोड़ आता है पुत्र
अंतिम शरणस्थली
उसे लगता है
उसकी तमाम शरण अब
छत विहीन हो गयी हैं
जहां सीधे सिर पर गिरती है बरसात औऱ धूप
पिता को जब छोड़ आता है पुत्र
अंतिम शरणस्थली
पिता की खुली आंख बंद हो जाती है
पुत्र की आंख खुलने लगती है
आंख में मगर तब धुंआ भरने लगता है
उसे उस वक्त सबके अधिक जरूरत होती है पिता की
और पिता सामने राख हो रहा होता है।
©वीरेंदर भाटिया
virendar bhatia