जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
त्याला धन्यवाद द्या
गुरू नानक बुद्ध बसवण्णा कबीर यांचे
ग्रंथ भेट द्या त्याला
एक प्रत संविधानाची द्या
आणि म्हणा, वाचत जा
जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
तेव्हा चहासाठी बोलवा त्याला
आणि दाखवा भारताचे हृदय
सांगा त्याला
हे खास हृदय आहे म्हणून
जे अनेक तुकड्यांनी बनलेय
तुकडे करू नकोस याचे
जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
तेव्हा त्याला शिवीखोर नका म्हणू
तो भरकटलेला तुमचाच भाऊ आहे
त्याला सांगा
की सेक्युलर असणे म्हणजे
वैश्विक अंतर्दृष्टीच्या दिशेने सरसावणे होय
विहिरीतला बेडूक नका म्हणू त्याला
जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
तेव्हा त्याला थंडगार पाणी पाजा
आणि सांगा
हे पाणी हिंदू मुस्लीम नाहीये
हा निसर्ग हिंदू-मुसलमानांचा नाहीये
हा देश तुमचा अथवा त्यांचा नाहीये
त्यांचा आहे जे प्राप्त करण्याआधी
देण्याच्या विचाराने भारलेले आहेत
तुम्ही त्याचे देणे विचारून त्याला लज्जीत करू नका
जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
त्याला विचारा
तुला धर्म वाचवायचा आहे की
माणुसकी
त्याला माणुसकी नका शिकवू
फक्त
त्याच्याबरोबर माणूस बनून राहा
तो सेक्युलर असणे समजून घेईल
एक ना एक दिवस.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जब कोई तुम्हें सेक्युलर कहे
जब कोई तुम्हे सेक्युलर कहे
उसे धन्यवाद कहना
बाबा नानक बुद्ध कबीर की किताबें भेंट करना उसे
एक प्रति संविधान की देना
कि पढ़ा करो
जब कोई तुम्हे सेक्युलर कहे
तो चाय पर बुलाना उसे
और दिखाना भारत का दिल
बताना उसे
यह विशेष दिल है
जो कई टुकड़ो से मिलकर बना है
टुकड़े मत करो इसके
जब कोई तुम्हे सेक्युलर कहे
तो उसे गालीबाज मत कहना
वह भटका हुआ तुम्हारा ही भाई है
उसे बताना
कि सेक्युलर होना वैश्विक अंतर्दृष्टि की तरफ बढ़ना है
कुएं का मेंढक मत बोलना उसे
जब कोई तुम्हे सेक्युलर कहे
उसे ठंडा जल पिलाना
और बताना
ये जल हिन्दू मुस्लिम नहीं है
ये प्रकृति हिन्दू मुस्लिम की नहीं है
ये मुल्क तुम्हारा या उनका नहीं है
उनका है जो पाने से पहले देने की सोच से लैस हैं
तुम उसका देना पूछ कर उसे शर्मिंदा मत करना
जब कोई तुम्हे सेक्युलर कहे
उससे पूछना
तुम्हे धर्म बचाना है या मनुष्यता
उसे मनुष्यता मत सिखाना
बस
उसके साथ मनुष्य बने रहना
वह सेक्युलर होना समझ जाएगा किसी रोज
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia