आवाज,गंध,स्थळं,लोकांच्या
आठवणी सोबत सोडत नाहीत
लोक तर कधी सोबत चालतात,
कधी नाही
हाक मारली तर कधी ऐकतात,
कधी नाही
समोर गाठ पडली
तर कधी पाहतात,कधी नाही
परंतू आठवणींना कधीही
भेटू द्या,
त्या मिठीत खेचून घेतात
चुंबनांचा वर्षाव करतात
रडताना साथ करतात
केसांमध्ये हात फिरवतात
पाठीवर हात फिरवतात
कितीही उशीर होऊ दे
जाण्याची घाई आहे
असे नाहीत म्हणत.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
स्मृतियाँ
आवाजों, गंधों, स्थानों, लोगों की
स्मृतियाँ साथ नहीं छोड़तीं
लोग तो कभी साथ चलते हैं,कभी नहीं
पुकारो तो कभी सुनते हैं,कभी नहीं
सामने पड़ जाएँ
तो कभी देखते हैं
कभी नहीं
लेकिन स्मृतियों से जब भी मुलाकात होती है
वे बाँहों में भींच लेती हैं
चुंबनों की झड़ी लगा देती हैं
रोने में साथ देती हैं
बालों में हाथ फिराती हैं
पीठ पर हाथ फेरती हैं
कितनी भी देर हो जाए
जाने की जल्दी है
यह नहीं कहतींं।
©विष्णु नागर
Vishnu Nagar