आजकाल राजा काय खातो?
मी राजाच्या स्वैपाक्याला विचारले.
तशी तर राजाची रेसिपी गुप्त असते
परंतू आपणांस सांगतोय
मग इकडेतिकडे बघून पुटपुटला,
आजकाल तो वस्तुस्थिती
आणि सत्य खात असतो.
न्याहरीला तथ्य आणि
जेवणाला सत्य.
मी आश्चर्यचकित झालो,
या पण काय खाण्याच्या गोष्टी आहेत?
परंतू तो राजा आहे ,
काहीही खाऊ शकतो!
तर मग त्यामुळेच देशात
वस्तुस्थिती आणि सत्य यांची टंचाई पडत चाललीय तर?
स्वैपाक्याला माझा पुढचा प्रश्न होता,
मग तो देश कसा चालवतो?
त्याने पुन्हा इकडे तिकडे बघितले आणि पुटपटला,
कथा-कहाण्यांनी.
कथा-कहाण्यांनी??
कहाण्यांनी कुठे देश चालत असतो?
पण चालत तर आहे!
मी निरुत्तर होतो.
माझा पुढचा प्रश्न होता की
या कथा रचल्या जातात कुठे?
त्याने खेद प्रकट केला आणि
म्हणाला,
मला ठाऊक नाही!
माझ्या डोक्यात पुन्हा एक प्रश्न चमकला.
राजाच्या खरकट्यात जे सत्य आणि तथ्य निघते त्यांचे पुढे काय होते?
महालाच्या मागच्या बाजूकडे बोट
दाखवत तो बोलला,
त्यांना इथे फेकून दिले जाते,
कुजण्यासाठी.
यानंतर रात्री मला झोप लागली नाही,डुलकी लागली तर पाहिले,
समोर तीच खोटारडी तथ्ये
आणि खोटी सत्ये उभी होती.
राजाची लाळ अजूनही त्यांवर
घोटाळत होती,
त्यांवर माशा घोंगावत होत्या,
ते जीव सोडण्याच्या बेतात असल्याचे जाणवत होते.
मला जाग आली,
मी घामाने डबडबलेलो
न जाणो कुठच्या प्रेरणेने की
मी रात्रीच्या दाट अंधारातच
घाबरत घाबरत वाचत वाचवत
त्या कुजत चाललेल्या
तथ्य आणि सत्य यांना एकत्र केले,
घरी आणून त्यांना धूतले,
स्वच्छ केले.
सत्याला तथ्यापासून वेगळे केले
आणि तथ्यांना जोडून सत्य तयार केले.
सकाळी संपूर्ण राज्यात
टीव्हीवाले नरडे फाड फाडून
ओरडत होते
राज्यातून तथ्य आणि सत्य यांची चोरी झाली आहे.
ही कुठल्यातरी दहशतवादी टोळीची चाल आहे.
ब्रेकिंग न्यूजमध्ये पाकचा हात असल्याचे
सांगितले जाऊ लागले.
एक टीव्हीवाला किंचाळत होता,
'कोण आहेत जे देशातून सत्य आणि तथ्य यांना चोरून त्यांचा खून करू पाहताहेत आणि देशात खोट्याला नकली नाण्यांसारखे पसरवू पाहताहेत'
राजाने तातडीने आपल्या गुप्तचर यंत्रणेतील विशेष प्रशिक्षित लांडग्यांना
या चोरीच्या मागावर धाडले.
राजाने घोषणा केली की
मागच्या राजाने सत्य आणि तथ्य यांना एकटे सोडले होते
परंतू आता आम्ही त्याचे रक्षण करू
आणि त्यासाठी एक सैन्यदल बनवू.
हे सगळे पाहून-ऐकून
माझ्याजवळचे तथ्य आणि सत्य खूपच घाबरले
आणि भूमिगत झाले.
भूमिगत होताना,
त्यांनी माझ्या कानात हळूच सांगितले,
जर खोट्यासाठी राजाला सैन्याची गरज भासत
असेल तर
सत्यासाठीसुद्धा सेनेची गरज पडेल,
काय तू माझ्यासाठी एक सेना तयार करू शकतोस?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
आजकल राजा क्या खाता है?
मैंने राजा के रसोइए से पूछा.
वैसे तो राजा की रेसिपी गुप्त होती है
लेकिन आपको बता देता हूँ
फिर इधर-उधर देखकर, फुसफुसा कर बोला
आजकल वह तथ्य और सत्य खाता है.
नाश्ते में तथ्य और खाने में सत्य.
मैं हैरान था कि ये भी कोई खाने की चीज़़ है.
लेकिन वो राजा है, कुछ भी खा सकता है.
तो क्या इसलिए देश मे तथ्य और सत्य की कमी होती जा रही?
रसोइए से मेरा अगला सवाल था.
फिर वो देश कैसे चलाता है?
उसने फिर इधर उधर देखा और फुसफुसा कर बोला
कहानियों से.
कहानियों से??
कहानियों से कहीं देश चलता है?
लेकिन चल तो रहा है.
मैं निरुत्तर था
मेरा अगला सवाल था कि ये कहानियां गढ़ी कहां जाती हैं?
उसने अफसोस जताया कि
उसे नहीं पता.
मेरे दिमाग मे फिर एक सवाल कौंधा
राजा के जूठन में जो सत्य और तथ्य निकलते हैं
उनका क्या होता है?
उसने महल के पिछवाड़े इशारा किया
उन्हें यहीं फेंक दिया जाता है, सड़ने के लिए.
इसके बाद रात मुझे नींद नहीं आयी
झपकी लगी तो देखा
सामने वही जूठे तथ्य और जूठे सत्य खड़े थे.
राजा की लार अभी भी उनपर लिपटी थी,
मख्खियां उन पर भिनभिना रही थी,
वे दम तोड़ते प्रतीत हो रहे थे.
मेरी नींद खुल गयी
मैं पसीने से तरबतर
न जाने किस प्रेरणा से
मैंने रात के घने अंधेरों में ही
डरते डरते बचते बचाते
उन सड़ते हुए तथ्य और सत्य को इकठ्ठा किया.
घर लाकर उन्हें धुला, साफ किया.
सत्य को तथ्य से अलग किया
और तथ्यों को जोड़कर सत्य बनाया.
सुबह पूरे राज्य में
टीवी वाले गला फाड़कर चिल्ला रहे थे
राज्य से तथ्य और सत्य की चोरी हुई है!
यह किसी आतंकवादी गिरोह की चाल है!
ब्रेकिंग न्यूज़ में पाक का हाथ बताया जाने लगा
एक टीवी वाला चिल्ला रहा था
कौन है जो देश से सत्य और तथ्य को चुराकर
उसका कत्ल करना चाहते हैं.
और देश में झूठ को खोटे सिक्के की तरह फैलाना चाहते हैं.
राजा ने आनन फानन में अपने ख़ुफ़िया तंत्र के
'विशेष प्रशिक्षित' भेड़ियों को इस चोरी के पीछे लगा दिया.
राजा ने ऐलान किया कि
पिछले राजा ने सत्य और तथ्य को अकेला छोड़ दिया था.
लेकिन अब हम इसकी रक्षा करेंगे.
और इसके लिए एक सेना बनाएंगे.
यह सब देख-सुन मेरे पास मौजूद तथ्य और सत्य
बेहद डर गए
और भूमिगत हो गए.
भूमिगत होते हुए, उन्होंने मेरे कान में धीमे से कहा
अगर झूठ के लिए राजा को सेना की ज़रूरत है
तो सत्य के लिए भी सेना की ज़रूरत होगी
क्या तुम मेरे लिए एक सेना तैयार कर सकते हो??
©मनीष आज़ाद
Manish Azad