छाती

छाती

छाती

स्त्रीची सर्वात आवडती जागा
पुरूषाची छाती आहे
जिथे ती सुरक्षितता अनुभवत असते

स्त्रीच्या छातीवर जेव्हा
भार यायला लागतो
ती पुरूषाच्या छातीला लागून हलकी होत असते

सकाळच्या एका अलिंगनाने ती
दिवसभर ऊर्जावान राहाते

परंतू पुरूषांना सांगितलं गेलं आहे
की छाती म्हणजे पराक्रमाचे प्रतिक आहे
आणि स्त्रियांना छातीशी लावणे
भित्र्या पुरूषांचे काम आहे

छाताडे
युद्ध आणि पराक्रम यांच्यासाठी आरक्षित 
करण्यात आली
आणि स्त्रियांसाठी निश्चित झाले
छातीवरती बांगड्या फोडणे

समाजाला धडधडत्या छातीवर डोके ठेऊन 
झोपी गेलेली स्त्री नेहमी खटकली
समाजाला मृत छातीवर बांगड्या फोडणारी 
स्त्री कधी खटकली नाही.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

स्त्री की सबसे पसंदीदा जगह
पुरुष का सीना है
जहां वह सुरक्षा का भाव सहेजती है

स्त्री के सीने पर जब
भार आने लगता है
वह पुरुष के सीने लग कर हल्की हो जाती है

सुबह के एक आलिंगन से वह
दिन भर ऊर्जावान रहती है

पुरुष को मगर बताया गया है
कि सीना बहादुरी का पर्याय है
और औरत को सीने से लगाना
कायर पुरुषों का काम है

सीने
युद्ध औऱ बहादुरी के लिए आरक्षित कर दिये गए
और स्त्रियों के लिये तय हुआ सीने पर चूड़ियां तोड़ना

समाज को धड़कते सीने पर सिर रख कर सोई स्त्री हमेशा अखरी
समाज को मृत छाती पर चूड़ियां तोड़ती स्त्री
कभी नही अखरी

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने