सुखी माणूस दुःखी माणसाला
फोन करत नसतो
त्याला भीती वाटत असते की
त्याच्याकडून काहीतरी मागितले तर
जाणार नाही
दुःखी माणूस जेव्हा सुखी माणसाला फोन करत असतो तेव्हा तो त्याचा फोन उचलत नसतो
अनेकवेळा फोन केल्यानंतर तो म्हणतो,
तो घाईत आहे
नंतर बोलू या
परंतू बोलण्यासाठी वेळ
नाही मिळत
पूर्वी सुखी माणूस
दुःखी माणसाचा
मित्र होता,घरी खूप येणेजाणे होते
दोघे एकमेकांच्या सुखदुःखात
सहभागी असायचे
जशी परिस्थिती बदलली
सुखी माणसाने अंतर राखले होते
जेव्हा तो आपल्या कारमधून
दुःखी माणसाला पायी चालताना
बघायचा तेव्हा
आपली नजर फिरवून घ्यायचा
दुःखी माणूस हे पाहून हसत असे
आणि देवाला दोष देत बसे
हे जग सुखी आणि
दुःखी लोकांनी
भरलेले आहे
सर्वांचे आपापले दुःख आणि सुख
आहे
या दरीचा फायदा सौदागर लोक
उचलत राहातात
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
सुखी आदमी दुखी आदमी को
फोन नही करता
उसे डर लगा रहता है कि
कहीं उससे कुछ मांग न
लिया जाय
दुखी आदमी जब सुखी आदमी
को फोन करता है तो उसका
फोन नही उठता
कई बार फोन करने पर वह
कहता है ,वह जल्दी में है
फिर बात करेंगे
लेकिन बात करने के लिए समय
नही मिलता
पहले सुखी आदमी दुखी आदमी
का दोस्त था ,घर में खूब
आना जाना था
दोनों एक दूसरे के सुख दुख
में शरीक थे
जैसे स्थिति बदली सुखी आदमी ने
दूरी बना ली थी
जब वह अपने कार से दुखी आदमी
को पैदल चलते हुए देखता था
अपनी नजर घुमा लेता था
दुखी आदमी यह देखकर मुस्कराता था
और ईश्वर को बद्दुआ देता था
यह दुनिया सुखी और दुखी लोगों
से भरी हुई है
सबके अपने अपने दुख और
सुख है
इस अंतर का फायदा सौदागर लोग
उठाते रहते हैं
©स्वप्नील श्रीवास्तव
Swapnil Shrivastav