दररोज कार्यालयामधून
परतत असतो सहा वाजेपर्यंत
आज थोडासा उशीरच झाला
आई दारात उभी असलेली दिसली
वडिल हातात काठी घेऊन
फिरताना हाॅलमध्ये
आई काळजीच्या स्वरात म्हणाली-
कुठे होतास इतका वेळ?
------
आईप्रमाणे वडिलांचे प्रेम
दिसून येत नसते
मला आलेले पाहून वडिल
खुर्चीवर आरामात बसत बोलले-
अरे आले असेल एखादे काम
आता आलाय ना!
आणि थंडगार झालेल्या चहाचे
असे काही घुटके घ्यायला लागले
की जणू काही खूप गरम असावा.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पिता
रोज़ दफ़्तर से
लौट आता हूं छह बजे तक
आज कुछ देर हो गई
मां दरवाजे़ पर खड़ी मिली
पिता हाथ में छड़ी लिए
टहलते हाॅल में
मां चिंता से भर कर बोली -
कहां रहे इतनी देर ?
...........................
मां की तरह पिता का प्यार
दिखाई नहीं देता
मुझे आया देख पिता
कुर्सी पर इत्मीनान से बैठते हुए बोले -
अरे आ गया होगा कोई काम
आ तो गया न
और पूरी तरह ठंडी हो चुकी चाय की
ऐसे लेने लगे चुस्कियां
जैसे कि बहुत गर्म हो वह ।
©दफ़ैरून
Dafairun Shrivastav