आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
राहिली ना सीमा
फेकावे ते किती
खोट्याची प्रशस्ती
देहू क्षेत्री

धरियेला जरी
वेष वारकरी
जहर अंतरी
भरलेले

जाणती तुकोबा
सोंगाड्याचे ढोंग
मंबाजीचा रंग
ओळखती

बुडविली ज्यांनी
अभंगांची गाथा
तेचि आता माथा
टेकविती

पांढरे नेसून
भुलविती जन
सनातनी मन
पालटेना

सांगती थोरवी
भ्याड भेत्रटांची
षंढ पुचाटांची
महती गाती

देहूचा विद्रोही
सत्याचा कैवारी
वेदांताला भारी
पडतसे

भाषेचा जहाल
वृत्तीचा मवाळ
वाणीचा वेल्हाळ
तुकाराम

शब्द शब्द त्याचे
कुणब्यांचे बळ
लबाडीला जाळ
लावितसे

बाप तो आमुचा
विवेकाचा वसा
वैदिकांना कसा
झेपणार?

देहू नि आळंदी
समतेच्या शाळा
शाखेचा ओंगळा
नाही खेळ!
🚩
       -भरत यादव
     Bharat Yadav

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने