प्रेम

प्रेम

प्रेम

अखेरची पताका
युद्ध जिंकणार्‍याची नव्हे
प्रेमाची फडकेल

अखेरचे फुल
सम्राटाला नव्हे
प्रियतमेला दिले जाईल

अखेरचे झाड
दरोडेखोरांना नव्हे
थकलेल्या पांथस्थाला सावली देईल

अखेरचा थेंब
समुद्राशी बंड करून
मरूस्थळातील
तृषार्त कंठाला तृप्त करेल

अखेरच्या ओळीत
घृणा आणि द्वेष नव्हे
प्रेम लिहिले जाईल.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अंतिम पताका 
युद्ध जीतने वाले की नहीं
प्रेम की फहराएगी

अंतिम पुष्प
सम्राट को नहीं
प्रेमिका को दिया जाएगा

अंतिम वृक्ष
डाकुओं को नहीं
थके पथिक को छाँव देगा

अंतिम बूँद
सागर से विद्रोह करके
मरुथल के
प्यासे कण्ठ को तृप्त करेगी

अंतिम पंक्ति में 
घृणा और द्वेष नहीं
प्रेम लिखा जाएगा।

©कुशल कौशल सिंह
Kushal Kaushal Singh 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने